पुणे शहर

कर्वेनगर मधील श्री मारुती भैरवनाथ ट्रस्टच्या तत्परतेमुळे निराधार वृद्ध महिलेला मिळाला आधार..

रुग्ण हक्क आंदोलन( महाराष्ट्र) व स्वामी वृध्दाश्रम यांची मोलाची झाली मदत..

कर्वेनगर : कर्वेनगर मधील श्री मारुती भैरवनाथ मंदिराबाहेर गेले अनेक दिवस झाडाखाली बसून असलेल्या दयनीय अवस्था झालेल्या निराधार वृद्ध महिलेस अखेर श्री मारुती भैरवनाथ ट्रस्टच्या सहकार्याने व पौड येथील स्वामी वृध्दाश्रमाच्या माध्यमातून आधार मिळाला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून मंदिराच्या बाहेर झाडाखाली एकाच जागी बसल्याने या वृध्द महिलेची अवस्था बिकट झाली होती. काही विचारले तर ती उत्तर ही नीट देत नव्हती. त्यामुळे श्री मारुती भैरवनाथ देवस्थान ट्रस्ट कर्वेनगरच्या अध्यक्षा लक्ष्मी नानासाहेब बराटे यांच्या मार्गदर्शनाखाली चेतन भालेकर व व्यवस्थापक सागर तनपुरे यांनी फोन करून सामजिक काम करत असलेले रुग्ण हक्क आंदोलन( महाराष्ट्र) चे दादासाहेब गायकवाड यांना याबाबत माहिती दिली. मंदिरा बाहेर एक वृध्द महिला एकाच जागेवर पडून आहे. तीला उठता येत नाही बसता ही येत नाही किंवा चालता ही येत नाही. औषधोपचारासाठी महिलेला हलवून पुढील योग्य सोय करणे गरजेचे असल्याचे त्यांना सांगण्यात आले.

त्यानंतर काही वेळात दादासाहेब गायकवाड कर्वेनगर मधील श्री मारुती भैरवनाथ मंदिराबाहेर आले. त्यांनी वृध्द महिलेची अवस्था पाहिली तर महिलेने स्वतःला संपुर्ण मेनकागदाने झाकून घेतलेले होते. जागेवरच प्राथमिक विधी करत असल्याने अवस्था बिकट झाली होती. तीला उठवले असता शांताबाई शंकर वाघमारे नाव असल्याचे सांगीतले. मुळ कर्नाटकची पोटाची खळगी भरण्यासाठी कुटुंबासह पुण्यात कर्वेनगर येथे आलेली.. नवरा चार मुले एक मुली सर्व वारलेले तर एक मुलगी जिवंत तीही भंगार वेचण्याचे करत असल्याचे तिच्या बोलण्यातून समजले.

एकाच जागेवर अनेक दिवसांपासून बसून, आंघोळ नाही त्यामुळे केसांच्या जटा झाल्याने दुर्गंधी येत होती. आजीच्या अंगावरील मेनकागद बाजूला हटवून तिला साबणाने स्वच्छ आंघोळ घालण्यात आली. रस्त्याने जाणाऱ्या अनिता थोरात या व एका शाळकरी मुलीची यासाठी मदत मिळाली. हे करत असताना नातेवाईकांना, नवर्‍याला आवाज देवून आजी जोर जोरात ओरडत होती. जटा कापून आजीला आंघोळ घालेपर्यंत व साडी नेसून ॲम्बुलन्स मध्ये बसवेपर्यंत अनिता व शाळकरी मुलीची मदत झाल्याने काम सोपे झाले होते.

आजी शारिरीक व मानसिक तंदुरुस्त होती त्यामुळे तिला हॉस्पिटल मध्ये भरती करण्याची अवश्यकता नव्हती. सांभाळणारे नातेवाईक कोणी नसल्यामुळे तिला रोडवर सोडणे योग्य नव्हते. गायकवाड यांनी स्वामी वृध्दाश्रमची संचलिका गौरी धुमाळ यांच्याशी संपर्क साधून आजीची परिस्थिती सांगीतली. त्यांनी आजीला आश्रमवर घेऊन या असे लगेच सांगितले. स्वामी वृध्दाश्रमात संबंधित आजींचे सर्व कागदपत्र रितसर नोंदणी करून दाखल करून पुनर्वसन करण्यात आले.

मारुती भैरवनाथ मंदिर ट्रस्ट कर्वेनगर अध्यक्षा लक्ष्मी नानासाहेब बराटे यांच्या हस्ते सामाजिक करत असलेल्या बाळासाहेब गायकवाड यांना सामाजिक कामासाठी आर्थिक व वस्तुरूपी मदत देण्यात आली. यावेळी ह.भ.प नारायण बराटे, कुमार बराटे, पोपट फेंगसे, विनोद बराटे, नामदेव शेडगे, अशोक पानेकर आदी ट्रस्टी उपस्थित होते.

Img 20221126 wa02126927299965323449855 1

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये