कोथरुडपुणे शहर

३५० वा शिवराज्याभिषेक दिन कोथरूडमध्ये जल्लोषात साजरा

पुणे : ६ जुन “शिवराज्याभिषेक दिन” म्हणुन साजरा केला जातो. राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेसच्यावतीने कोथरूड गावठाण येथील छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या स्मारकाला शिवाराज्याभिषेक दिनानिमित्त वंदन केले आणि पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

राष्ट्रवादी विद्यार्थी काॅंग्रेसचे ऋषिकेश कडू श्रीकांत बालघरे यांनी कोथरूड क्षेत्रिय कार्यालयाला विनंती केली होती की ३५० वा शिवराज्याभिषेक दिन असल्याकारणाने स्मारकाच्या सभोवताली सजावट करण्यात यावी ती मागणी मान्य केल्याबद्दल त्यावेळी त्यांचे ही आभार मानन्यात आले.

याप्रसंगी प्रमुख उपस्थिती पुणे राष्ट्रवादी काँग्रेसचे चिटणीस संतोष डोख, विद्यार्थी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष शुभम माताळे, सत्यम पासलकर, पंकज कंधारे उपस्थित होते.

Fb img 16837376233493064729888638918603
Img 20220425 wa001080841499313169957854513307260893077682

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये