पुणे शहर

कोरोना बरोबरच डेंग्यु , मलेरीयाकडे ही लक्ष द्या : धुमाळ 

पुणे :  पुणे शहरात कोरोना विषाणू चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत असतानाच डेंग्यू मलेरिया या आजारांनी आता डोके वर काढले आहे. या आजारांचे रुग्ण आता सापडू लागल्याने महापालिका प्रशासनाने आता कोरोना बरोबरच डेंग्यु व मलेरीयाकडेही लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी महापालिकेतील विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केली आहे.

याबाबतचे पत्र धुमाळ यांनी महापालिका आयुक्तांकडे दिले आहे. त्यांनी म्हंटले आहे की,  कोरोनाचा प्रादुर्भाव  वाढत असतानाच शहरात डेंग्युचा आजारही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. कोरोना रोखण्यासाठी प्रशासन दिवसरात्र प्रयत्न करत आहे. आता डेंग्यूमुळे डोकेदुखी वाढली असून प्रशासनाने गांभीर्याने याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.

डेंग्यु व मलेरीयाचे रुग्ण अधिक वाढत असुन त्यावर उपाययोजना करण्यासाठी महापालिकेने विशेष काळजी घेतली पाहिजे. दरवर्षी पालिकेकडून पावसाळ्यात डेंग्यू बाबत जनजागृती करत औषध फवारणी केली जाते मात्र सध्या कारोना परिस्थितीमुळे प्रशासनावर ताण असल्याने त्यांच्याकडून  डेंग्यू , मलेरिया कडे दुर्लक्ष होत आहे. डेंग्यूत  आणि कोरोनात तपाचे लक्षण सारखे आहे. त्यामुळे ही नागरिकांमध्ये घाबराट आहे.

प्रशासनाने नागरिकांमध्ये या आजाराविषयी अधिक जनजागृती करून परिसरामध्ये स्वच्छता, औषध व धुर फवारणी अशा उपाययोजना तातडीने राबवाव्यात. तसेच कोरोनाप्रमाणेच हा आजार भयंकर असल्याने डेंग्यू व मलेरिया रुग्णांना वेळेत उपचार कसे मिळतील व या आजाराला कसे रोखता येईल याचे नियोजन करून त्याची जबाबदारी विशेष अधिकाऱ्यांकडे देण्याची मागणी धुमाळ यांनी केली आहे.

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये