
पुणे : कोरोना च्या कालावधी मध्ये प्लाझ्मा दानासाठी स्वराज प्रतिष्ठान व प्रल्हाद सायकर यांनी घेतलेला पुढाकार हा महत्त्वपूर्ण आहे . अधिकाधिक नागरिकांनी प्लाझ्मा देण्यासाठी पुढे आले पाहिजे. यासाठी भारतीय जनता पार्टी विशेष प्रयत्न करत असून त्याला चांगला प्रतिसादही मिळत आहे असे भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
भारतीय जनता पार्टी व स्वराज प्रतिष्ठान यांच्या वतीने रक्तदान शिबिर व प्लाजमा दान कर्त्यांची नोंदणी चे आयोजन बाणेर येथे करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते.
यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपा संघटन सरचिटणीस राजेश पांडे,सरचिटणीस गणेश घोष,सरचिटणीस राजेश येनपुरे ,सरचिटणीस दिपक पोटे,कोथरूड मतदार संघ अध्यक्ष पुनीत जोशी, नगरसेविका स्वप्नाली सायकर, प्रल्हाद सायकर, नगरसेवक अमोल बालवडकर, नगरसेविका ज्योती कळमकर, गणेश कळमकर, प्रकाश बालवडकर, राहुल कोकाटे, स्वीकृत नगरसेवक सचिन पाषाणकर ,डॉक्टर राजेश देशपांडे आदी उपस्थित होते.
यावेळी बाणेर बालेवाडी परिसरामध्ये कोरणा योद्धा म्हणून काम करणाऱ्या कर्मचारी, डॉक्टर तसेच नागरिकांचा देखील या वेळी सत्कार करण्यात आला.
या शिबीरामध्ये 117 जनांनी रक्तदान केले व प्लाझमा दान करण्यासाठी 30 हुन अधिक नाव नोंदणी करण्यात आली.



