पुणे शहर

गुरुवारी पुणे शहराचा पाणीपुरवठा राहणार बंद…

पुणे : पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. गुरुवार 21 डिसेंबर रोजी संपूर्ण पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. पुणे महापालिकेकडून अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Img 20231109 wa0012281291226259195260975368

पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, लष्कर जलकेंद्र, नवीन आणि जुने होळकर जलकेंद्र, भामा-आसखेड जलकेंद्र, वारजे, एसएनडीटी, चतु:श्रृंगी, वडगांव जलकेंद्र, अशा अनेक ठिकाणी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत.

Img 20230717 wa0012281294586790481769091554

या ठिकाणी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून अत्यावश्यक देखभाल आणि दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहे. त्यासाठी पुणे शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय महानगरपालिकेकडून घेण्यात आला आहे

Img 20230511 wa0002282292722773256594657904

तसेच पुण्यात शुक्रवार सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाण्याचा पुरवठा करण्यात येणार आहे. पुणे महानगरपालिके कडून जाहीर नोटीस देखील काढण्यात आले आहे. पुण्यातील मध्यवर्ती भाग तसेच पेठांमध्ये गुरुवारी पाणी येणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे पुणेकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.

Img 20231109 wa00107449750233581593236
Img 20230812 wa0001281295283768095978676207

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये