उन्हाळ्यात पशू पक्षांसाठी केली पाण्याची सोय ; वारजे वनक्षेत्र परिसरात महेश बराटे मित्र परिवाराचा उपक्रम..

वारजे : उन्हाळा सुरू झाला की वन क्षेत्रातील पशू पक्षांची पाण्यासाठी भटकंती सुरू होते. याचा विचार करून एनडीए रस्त्यावरील वनक्षेत्र परिसरातील पशू पक्षांचे उन्हाळ्यात पाण्यासाठी हाल होऊ नयेत यासाठी महेश बापूसाहेब बराटे मित्र परिवाराच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी ही पाण्याची सोय करण्यात आली आहे.
महेश बराटे मित्र परिवाराच्या सलग १२ वर्ष हा उपक्रम राबवला जात आहे. दरवर्षी संपूर्ण उन्हाळा अशा पद्धतीने प्राण्यांसाठी पक्षांसाठी पाण्याची सोय करून मुक्या जीवांची तहान भागवली जाते. वारजे माळवाडी एनडीए रोड लगत असलेल्या वन क्षेत्रातील नैसर्गिक तळ्यांमध्ये टँकरच्या माध्यमातून पाणी सोडण्यात येत असते. या वर्षी १० ते १२ टँकर पाणी टप्प्या टप्प्याने या तळ्यांमध्ये टाकणार असल्याचे महेश बराटे यांनी सांगितले.

या वेळी माजी नगरसेवक राजाभाऊ बराटे, दत्ता वांजळे , दिपक वांजळे , शरद पारगे , विकास पाटील, रोहन लभडे, दीपक लोंढे आदी उपस्थित होते. करोनासारख्या संकट काळातही खंड न पाडता हा उपक्रम राबवण्यात आला होता. या उपक्रमामुळे दर उन्हाळ्यात पशू पक्षांची पीण्याच्या पाण्याची चांगली सोय होत आहे. त्यामुळे नागरिकांकडून या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.









