महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा आणि राष्ट्रीय,आंतरराष्ट्रीय निवड स्पर्धेत डोपिंग चाचणी बंधनकारक करावी- कुस्ती मल्लविद्या महासंघाची केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे मागणी

पुणे : महाराष्ट्र केसरी स्पर्धा त्याचप्रमाणे राष्ट्रीय/ आंतरराष्ट्रिय निवड चाचणी स्पर्धेमधे डोपिंग चाचणी बंधनकारक व्ह्यावी आणि त्यासाठी लागणारा सर्वप्रकारचा खर्च राज्य सरकारने करावा यासाठी कुस्ती मल्लविद्या महासंघ पुणे शहर तांत्रिक समिती अध्यक्ष पै निकुंज दत्तात्रय उभे यांनी महासंघाच्या वतीने पुणे शहराचे खासदार व केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याकडे निवेदन दिले.
केंद्रीय मंत्री,पुण्याचे खासदार तसेच महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे उपाध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांना कुस्ती मल्लविद्या महाराष्ट्र महासंघ पुणे शहर यांच्याकडून आपल्या महाराष्ट्रामधील कुस्तीक्षेत्रामधील सर्व पैलवान, वस्ताद ,कुस्तीशौकीनंच्या मनांतील कळवळीची खदखद म्हणजे येथून पुढच्या काळात होणाऱ्या प्रत्येक महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा व राष्ट्रिय/आंतरराष्ट्रिय निवड चाचणी कुस्ती स्पर्धेमधे डोपिंग चाचणी बंधनकारक व्ह्यावी आणि त्याचा संपूर्ण खर्च हा राज्य सरकार कडून करण्यात यावा ह्यासाठी निवेदन देण्यात आले.
ह्यावर काही महत्वाच्या मुद्यावर काही गोष्टी सखोल विचार करुण अतिशय गंभीर्याने भूमिका घेऊन कुस्ती व अन्य कोणत्याही मैदानी खेळाडू आणि खेळ हा बदनाम होऊन द्यायचा नाही
कुस्ती क्षेत्राला डोपिंगमुक्त करण्याच आश्वासन ह्यावेळी मोहोळ दिले आहे.










