धन्यवाद किशोर दादा फक्त तुमच्यामुळे आम्ही महिला सुरक्षितपणे मनसोक्त दहीहंडीचा आनंद घेऊ शकलो.

कोथरूडमध्ये किशोर शिंदे आयोजित महिला दहीहंडी जल्लोषात साजरी
कोथरूड: धन्यवाद किशोर दादा फक्त तुमच्यामुळे आम्ही महिला सुरक्षितपणे मनसोक्त दहीहंडीचा आनंद घेऊ शकलो. अशा भावना महाराष्ट्रातील एकमेव महिला दहीहंडीत सहभागी झालेल्या महिलांनी व्यक्त करत आयोजक मनसेचे प्रदेश सरचिटणीस, नगरसेवक किशोर शिंदे यांचे आभार मानले.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना व ओम चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने कोथरूड मधील जीत मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या महिला दहीहंडीत कोथरूड मधील महिलांनी सहभाग घेत दहीहंडीचा मनसोक्त आनंद घेतला. महिला सुरक्षारक्षक व मन सैनिकांच्या सुरक्षा कवच असलेल्या या महिला दहीहंडीत महिलांनी हिंदी मराठी रिमिक्स गाण्यावर ठेका धरत धमाल केली.

आदर स्त्री शक्तीचा, जागर स्त्री शक्तीचा असे घोषवाक्य असणारी ही महिला दहीहंडी मुंबईतील चेंबूर येथील गोपीका पथकाने फोडली आणि उपस्थित हजारो महिलांनी जल्लोष केला. अतिशय सुरक्षित वातावरणात ही दहीहंडी होत असल्याने मोठ्या संख्येने कोथरूड मधील महिला या दहीहंडी उत्सवात सहभागी होत असतात. यावेळी महिलांनी सिंहासन न्यूजशी बोलताना केवळ किशोर दादामुळे आम्ही महिला दरवर्षी सुरक्षितपणे मनसोक्त दहीहंडीचा आनंद घेऊ शकतो अशा भावना व्यक्त केल्या. यातील बहुसंख्य महिला दरवर्षी येणाऱ्या होत्या तर काही पहिल्यांदाच आलेल्या महिलांनी देखील येथील महिला सुरक्षा व नियोजन पाहून या दहीहंडी उत्सवात सहभागी झाल्याने आनंद झाल्याचे सांगितले.



या दहीहंडीचे संयोजन गणेश शिंदे, संजय काळे, श्रीकांत अमराळे, साधू धुमाळ, रवी वाल्हेकर, विश्वास किरमिटे, शशांक अमराळे, धनंजय बलकवडे, प्रतिक कंधारे, प्रकाश अडसूळ, ओंकार तुपे, आकाश बोबडे, यांच्यासह असंख्य महाराष्ट्र सैनिकांनी केले.









