पुणे शहर

भारतीनगर जवळील नाल्यात रोज होणाऱ्या डुकरांच्या मृत्यूचे गूढ काय ? विषबाधा की आणखी काय..तपासाची दुष्यंत मोहोळ यांची मागणी..

कोथरूड : भारतीनगर ते भीमाले टॉवर दरम्यान असलेल्या नाल्यात गेल्या ५ दिवसांपासून रोज ४-५ वराह (डुक्करे) मृत अवस्थेत आढळत आहेत, यामुळे परिसरात दुर्गंधी पसरली जात असून, संभाव्य आजार व संसर्गजन्य रोगांचा धोका निर्माण होण्याची शक्यता वाढली आहे. या डुकरांच्या मृत्यूचे नेमके गूढ काय ? विषबाधा की आणखी काय.. आरोग्याचा धोका निर्माण होऊ नये यासाठी तपासाची मागणी  दुष्यंत मोहोळ यांनी केली आहे. 

याबाबत तक्रारी आल्यानंतर दुष्यंत मोहोळ यांनी आज कोथरूड बावधन क्षेत्रिय कार्यालयाचे महापालिका सहाय्यक आयुक्त विजय नाईकल, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक राम सोनवणे यांना घेऊन या भागाची पाहणी केली. या प्रकारामुळे परिसराचे आरोग्य धोक्यात येऊ नये यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी मोहोळ यांनी केली आहे. ही मरून पडलेली डुकरे उचलण्याची व्यवस्था करून याबाबत योग्य ती उपाययोजना करण्याचे असे नाईकल यांनी सांगितले आहे.

Img 20240404 wa0017281298374058713843994116

परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, पुणे महानगरपालिकेच्या संबंधित विभागाने खालील उपाययोजना करण्याचे दुष्यंत मोहोळ यांची मागणी

1. मृत वराहांची त्वरित विल्हेवाट लावावी, जेणेकरून परिसरात होणाऱ्या दुर्गंधी व रोगराईला आळा बसू शकेल.
2. शवविच्छेदन करून मृत्यूचे नेमके कारण शोधावे – विषबाधा झाली आहे की नवीन कोणता संसर्गजन्य रोग पसरत आहे? याची सखोल तपासणी करण्यात यावी.
3. परिसरात निर्जंतुकीकरण व स्वच्छता मोहीम तात्काळ राबवावी, जेणेकरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येणार नाही.
4. अनधिकृत वराहपालन करणाऱ्यांविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना टाळता येतील.
5. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने विशेष खबरदारी घेत परिसरात कोणताही साथीचा आजार पसरू नये यासाठी
प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.

या संदर्भात आपण उद्या महापालिकेचे आरोग्य प्रमुख सारिका फंडे यांची भेट घेणार असून या नागरिकांच्या आरोग्यासाठी या प्रश्नात गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी करणार असल्याचे दुष्यंत मोहोळ यांनी सांगितले.

Img 20240404 wa0013281293529802052601663206

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये