पुणे शहर, जिल्हा

खडकवासला धरणातून रात्री ९.३० वाजल्यापासून १५००० क्युसेक्सने विसर्ग

पुणे : आज दि. १९/०६/२०२५ रोजी खडकवासला धरणातून सुरू असलेला ८७३४ क्युसेक विसर्ग वाढवुन रात्री ९.३० वाजता १५००० क्युसेक्सने विसर्ग सोडण्यात येणार आहे. सदर विसर्गाची टप्प्याटप्प्याने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जलसंपदा विभाग खडकवासला पाटबंधारे विभाग, पुणे च्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

पावसाचे प्रमाण पाहता विसर्गामध्ये वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तरी पुणे महानगरपालिका परिसरात सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावर असल्यास तात्काळ हलविण्यात यावी. तसेच नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 

Screenshot 20250508 083342 samsungnotes1092093488754539978

प्रशासकीय विभागांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. पुणे शहरामध्ये आषाढी वारी पालखी सोहळा निमित्त पुणे शहरामध्ये वारकरी भाविकांचे आगमन होत आहे तरी वारकरी भाविकांना नदीपात्रात उतरून न देण्याचा बंदोबस्त करून
योग्य ती खबरदारी घेण्याचे आदेश मध्यवर्ती पुरनियंत्रण कक्ष,संनियंत्रण अधिकारी श्वेता यो. कु-हाडे यांनी दिले आहेत.

Img 20250618 wa02555226425519435283235
Img 20240404 wa0013282295463184266198901191

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये