
पृथ्वीराज शशिकांत सुतार यांच्या प्रयत्नातून कोथरूड येथे शिवसेनाप्रमुख श्री.बाळासाहेब ठाकरे कलामंदिर-नाट्यगृहाची संजय राऊत यांनी केली पाहणी.
पुणे : पुणे शहराचे व शिवसेनाप्रमुखांचे एक विशेष नाते होते. या नात्याच्या अनुषंगाने पुणे व बाळासाहेब यांच्या संबंधांवरील निवडक दहा प्रसंगांचे एक स्मृती-दालन कोथरूडमधील शिवसेनाप्रमुख श्री.बाळासाहेब ठाकरे कलामंदिर-नाट्यगृहामध्ये उभारण्याबाबत सुचना शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते व खासदार संजय राऊत यांनी दिल्या.
पुणे महानगरपालिकेचे शिवसेना गटनेते ,नगरसेवक पृथ्वीराज शशिकांत सुतार यांच्या प्रयत्नातून कोथरूड येथे शिवसेनाप्रमुख श्री.बाळासाहेब ठाकरे कलामंदिर-नाट्यगृह बांधण्यात येत आहे.या नाट्यगृहाच्या कामाची पाहाणी करण्यासाठी शिवसेना नेते,शिवसेना संसदिय मंडळाचे नेते,पश्चिम महाराष्ट्राचे शिवसेना संपर्क नेते,खासदार संजय राऊत यांनी भेट दिली.

या भेटीच्या दरम्यान त्यांनी संपूर्ण कामाची पाहणी करून,कामाबाबत समाधान व्यक्त केले व हे नाट्यगृह पुणेकर नाट्य-रसिकांसाठी लवकरात लवकर सुरू करावे असे सांगितले.पुणे शहराचे व शिवसेनाप्रमुखांचे एक विशेष नाते होते. या नात्याच्या अनुषंगाने पुणे व बाळासाहेब यांच्या संबंधांवरील निवडक दहा प्रसंगांचे एक स्मृती-दालन उभारण्याबाबत सुचना दिली,तसेच या स्मृती -दालनामध्ये उभारण्यात येत असलेल्या शिवसेनाप्रमुखांच्या अर्धपुतळ्याचीसुद्धा पाहणी केली व त्याबाबत महत्त्वाच्या सूचना देऊन मार्गदर्शन केले.



या प्रसंगी शहरप्रमुख संजय मोरे,पिंपरी – चिंचवड महापालिकेचे शिवसेना गटनेते राहुल कलाटे,गजानन थरकुडे,राजेश पळसकर,अतुल राजूरकर,युवा-सेना अँड.धर्मराज सुतार,अधीक्षक अभियंता-भवन विभाग शिवाजी लंके,सहआयुक्त संदीप कदम,उपअभियंता उपेंद्र वैद्य ,सहाय्यक अभियंता विलास मोराळे,कार्यकारी अभियंता -विद्युत योगेश माळी,अभियंता -विद्युत विभाग राजेंद्र गोसावी,शिल्पकार स्वप्निल परदेशी,शिल्पकार संजय परदेशी हे उपस्थित होते.



