बाळासाहेबांचे हात बळकट करायचे आहेत

मुंबई : स्वबळावर विधानसभेवर भगवा फडकविण्याची घोषणा झाली. त्यापाठोपाठ काँग्रेस पक्षही सक्रीय झाला असून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे हात बळकट करावयाचे आहेत, असा निर्धार माजी मुख्य मंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केता.
शिवसेनेचे रणजितसिंह देशमुख यांनी पुन्हा काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात उपस्थित होते.
महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे सरकार असून मुख्य मंत्रीपद शिवसेनेचा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आहे. उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादीच्या अजित पवारांकडे आहे. त्या खालोखाल महसूल खाते बाळासाहेब थोरात यांच्याकडे आहे. थोरात यांचे हात बळकट करायचे असे विधान पृथ्वीराज चव्हाण करतात तेव्हा त्यांना मुख्य मंत्री पद अपेक्षित आहे की उपमुख्यमंत्रीपद या बद्दल संभ्रम तयार झाला आहे.आघाडीने दोन उपमुख्यमंत्री नेमावेत अशी चर्चा झाली होती.आघाडीतील तीनही पक्षांच्या महत्वाकांक्षा वाढल्या आहेत.







