पुणे शहर

पालिका कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता द्यावा यासाठी धुमाळ व बागुल यांच्याकडून प्रस्ताव

कोरोना काळात पालिका कर्मचाऱ्यांनी जोखीम पत्करून जबाबदारी पार पडली.

पुणे : २४  मार्च ते १७  मे,२०२० व १४ जुलै  ते २३ जुलै  २०२० य ६५ दिवसांच्या लॉकडाऊन  कालावधीमध्ये कोरोना विषयक काम करणारे मनपा कर्मचारी, मानधनावरील कर्मचारी,  ठेकेदारी  पद्धतीने असलेले कर्मचारी यांनी प्रत्यक्ष केलेल्या कामाच्या प्रमाणात हजर दिवसाप्रमाणे प्रतिदिन रु.१५०/- प्रोत्साहन भत्ता देण्यात यावा असा प्रस्ताव महापालिकेतील विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ व काँग्रेस गटनेते आबा बागुल यांच्याकडून स्थायी समितीकडे देण्यात आला आहे.  

महाराष्ट्र राज्य शासनाने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दि. १३ मार्च २०२०  पासून  लागू  करून खंड  २,३,४  मधील  तरतुदीनुसार  अधिसूचना  निर्गमित केली. सामान्य प्रशासन विभाग, शासन  निर्णय क्र.समय/२०२०/प्र.क्र.३५/१८  (र.व.का.),  दि.१८ मार्च,  २०२०  अन्वये  कोरोना  विषाणू  प्रसारावरील प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्य 
शासकीय  कार्यालयातील  अधिकारी  /कर्मचारी  यांची उपस्थिती नियंत्रित करण्याबाबत निर्देश देण्यात आलेले होते. 

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 00 pm

जाहीर करण्यात आलेल्या लॉक डाऊन कालावधीमध्ये सर्व लोकल सेवा, परिवहन सेवा,  व  इतर  दैनिक  प्रवासी  सेवा  बंद  करणेत  आलेल्या  होत्या. त्यामुळे अत्यावश्यक  सेवेतील सर्व अधिकारी कर्मचारी  यांना  कामाच्या ठिकाणी  येजा  करण्यास  अडचणी  निर्माण  झाल्या  होत्या.  तसेच  सदरच्या  लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दैनंदिन सेवा तसेच हॉटेल, रेस्टॉरंट व भोजनालय बंद करण्यात आलेली होती. त्यामुळे सदरहून कर्मचारी यांना भोजनाची देखील  व्यवस्था  उपलब्ध  झाली  नव्हती.

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm

पुणे महानगरपालिका नियमित सेवेतील तसेच  अत्यावश्यक सेवेतील सर्वच अधिकारी कर्मचारी  यांनी  जोखीम  पत्करून  कामावर  हजार  राहून  त्यांचेवर  सोपविलेली  जबाबदारी  योग्यरीत्या  पार  पाडली आहे. कोरोना विषाणूचा प्रसार व त्यावरील  उपाययोजना अंतर्गत महानगरपालिकेने विवध  स्थापन केलेले कक्ष, रुग्णालये, कोविड केअर  सेंटरमध्ये महापालिकेतील बहुतांशी सर्वच विभागातील अधिकारी कर्मचारी लॉक डाऊन कालावधी मध्ये देखील वेळेचे बंधन न पाळता नेमून दिलेले काम करत आहेत त्यामुळे त्यांना प्रोत्साहन भत्ता मिळवा यासाठी प्रस्ताव दाखल करण्यात आल्याचे धुमाळ व बागुल यांनी सांगितले.

Img 20201118 wa0057

 

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये