स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजप चे अमरीश पटेल विजयी

धुळे – धुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज संस्थेच्या विधानपरिषद पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत चार मतं अवैध, भाजपच्या अमरीश पटेल यांना 332 तर काँग्रेसचे अभिजित पाटील यांना 98 मतं मिळाली, अमरीश पटेल यांचा विजय, मात्र अधिकृत घोषणा झालेली नाही
पुणे पदवीधर, शिक्षक मतदार संघ निवडणूक मतमोजणी प्रक्रियेस सुरुवात, पुणे पदवीधरमध्ये भाजपकडून संग्रामसिंह देशमुख आणि राष्ट्रवादीचे अरुण लाड आणि अपक्ष श्रीमंत कोकाटे यांच्यात प्रमुख लढत झाली. या ठिकाणी मनसेच्या रुपाली पाटील देखील मैदानात आहेत. तर औरंगाबाद पदवीधरमध्ये राष्ट्रवादीचे सतीश चव्हाण आणि भाजपचे शिरीष बोराळकर यांच्यात लढत झाली. नागपूर पदवीधरमध्ये भाजपचे संदीप जोशी आणि काँग्रेसचे अभिजित वंजारी यांच्यात थेट लढत झाली. तर पुणे शिक्षक मतदारसंघात काँग्रेसचे जयंत आसगावकर आणि भाजपचे जितेंद्र पवार आणि अपक्ष म्हणून मैदानात असलेले दत्तात्रय सावंत यांच्यात प्रमुख लढत झाली. तर अमरावती शिक्षक मतदारसंघात शिवसेनेचे श्रीकांत देशपांडे आणि भाजपचे नितीन धांडे यांच्यात लढत झाली.










