पुणे शहर

महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयाचे जयंत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव सनी  मानकर यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन.

पुणे:  राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयाचे व सिंहगड रोड, सनसिटी रोड वरील एस.एम.फिटनेस क्लबचे उदघाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव चैतन्य उर्फ सनी अशोक मानकर यांनी केले होते.

यावेळी जयंत पाटील यांनी विद्यार्थी संघटनेवर कशा प्रकारे काम करावे यावर मार्गदर्शन करताना जास्तीत जास्त विद्यार्थी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस बरोबर जोडण्यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले.  पाटील यांनी यावेळी सनी मानकर यांच्या कामाचे कौतुक करताना त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 00 pm

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष, आमदार चेतन तुपे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष स्वाती पोकळे, माजी उपमहपौर, नगरसेवक दीपक मानकर, नगरसेवक प्रशांत जगताप, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष काका चव्हाण, कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष स्वप्नील दुधाने, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पुणे विभागीय अध्यक्षा संध्या सोनवणे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष सुहास कदम, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे कोकण विभाग प्रमुख किरण शिखरे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे आय.टी.सेल प्रमुख जितेश सरडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नाशिक विभाग प्रमुख चिन्मय गाडे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नागपूर विभाग प्रमुख आशिष आवळे त्याचप्रमाणे प्रदेश कार्यकारणी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm

Related Articles

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये