पुणे शहर

कोथरूड परिसरात पुन्हा एकदा गव्याचे दर्शन

गर्दी न करण्याचे आवाहन

पकडण्यासाठी वनखात्याची टीम दाखल

पुणे : पुण्यात कोथरूड परिसरातील बावधन मध्ये कात्रज देहू बाह्यवळण महामार्गालगत आज (मंगळवारी) सकाळी ७ वाजल्यापासून एक मोठा गवा (Indian Gaur) आला आहे. याबाबत स्थानिक नागरिकांनी तक्रार केल्यानंतर वनखात्याची टीम ट्रँक्विलायझर घेऊन तिथे पोहोचली आहे.

मंगळवारी बाहेर पडलेल्या नागरिकांना अचानक गव्या चे दर्शन झाल्याने घबराट पसरली आहे. बावधन मधील महामार्गालगत च्या मोकळ्या जागेमध्ये या गवा दिसला. यापूर्वी गेल्या दहा- बारा दिवसां पूर्वी महात्मा सोसायटीत गवा आला होता. मात्र दु्दैवाने त्या गव्याचा मृत्यू झाला होता.

नगरसेवक किरण दगडे पाटील म्हणाले, मी याबाबतीत वनविभागाला तक्रार केली आहे. त्यांचे पथक याठिकाणी आले आहे. नागरिकांनी कृपया गर्दी करू नये. गव्याला सुरक्षितपणे पकडण्यासाठी योग्य प्रयत्न सुरु आहेत.

Img 20201213 wa0074
Whatsapp image 2020 11 13 at 2. 39. 13 pm

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये