मराठी भाषा संवर्धन समितीच्या उपक्रमांबाबत दिपाली धुमाळ यांनी केल्या या मागण्या…

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या वतीने मराठी भाषा संवर्धन समिती संपुर्ण पुणे शहरात मराठी भाषा संवर्धन समितीच्या वतीने साहित्यिक कट्टा हा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमात अनेक ज्येष्ठ नामवंत लेखक, कवी, साहित्यिक कलावंत यांच्यामार्फत मराठी भाषेचा प्रचार व प्रसार केला जातो. या साहित्यिक कट्ट्याच्या माध्यमातून मराठी भाषेची आवड निर्माण होत असल्याने विरोधी पक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांनी विविध मुद्दे उपस्थित करत महापौर व मराठी भाषा संवर्धन समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत.
आज महापालिकेत झालेल्या साहित्यिक मराठी भाषा संवर्धन समितीच्या बैठकीच्या वेळी धुमाळ यांच्याकडून या विषयासंदर्भातील पत्र मोहोळ यांना देण्यात आले आहे. बैठक बोलावून धुमाळ यांनी सुचवलेल्या मुद्द्यांवर चर्चा करण्याचे आश्वासन मोहोळ यांनी दिले आहे.
मराठी भाषा संवर्धन समिती व साहित्यिक कट्ट्या संदर्भात दिपाली धुमाळ यांनी खालील मुद्दे सुचवले आहेत.
१)पुणे शहरामध्ये सद्यस्थितीत अस्तित्वात असलेली साहित्यिक कट्टा मध्ये अनेक कार्यक्रम राबविले जातात सदर कार्यक्रमांमध्ये नामवंत व्यक्तींना बोलवले जाते त्या बोलविण्यांत आलेल्या व्यक्तींना देण्यात येणाऱ्या मानधनात वाढ करण्यात यावी.( सध्या रक्कम रुपये ५००/ ऎवजी रक्कम रुपये २००० पर्यंत वाढ करण्यात यावी)
२)सध्या अस्तित्वात आहे त्या प्रत्येक साहित्यिक कट्ट्यात मराठी भाषेतील नामवंत साहित्यिकांचे ग्रंथ,पुस्तके, कादंबऱ्या ग्रंथालयासाठी उपलब्ध करून देण्यात यावी.
३)मराठी भाषा संवर्धन समिती पुणे साहित्यिक कट्टयाचे संचालक मंडळ आहे त्यांना किमान तीन महिन्यातुन एकदा पुणे महानगरपालिकेच्या मराठी भाषा संवर्धन समिती बैठकीला आमंत्रित करावे.

४) मराठी भाषा संवर्धन समितीची बैठक किमान महिन्यातून एकदा तरी आयोजित करण्यात यावी.
५) महापालिकेनी वेगवेगळ्या प्रकारच्या शिबिरांचे आयोजन करावे.
६)वाचन संस्कृतीसाठी महापालिकेने विशेष प्रयत्न करावेत. उदा.पुस्तक प्रदर्शनांचे आयोजन
अभिवाचनाचे कार्यक्रम ठेवणे.



७) वेगवेगळ्या विषयांवर आधारित कविसंमेलने आयोजित करण्यात यावी.
८) देहू,आळंदी,सासवड इ.ठिकाणी रसिकांच्या सहली आयोजित करणे.
९) गाजलेले, जुने-नवे पारितोषिक विजेते चित्रपट दाखवणे.
१०) लेखकांच्या मुलाखती घेणे.
११) लेखन स्पर्धांचे आयोजन करणे.
१२) मुलांसाठी आणि मोठ्यांसाठीही एक दिवसीय साहित्य संमेलन भरवणे.



