जय संघर्ष वाहनचालक सामाजिक संस्थेचा चौथा वर्धापनदिन साजरा

पुणे : जयसंघर्ष वाहनचालक सामाजिक संस्था-महाराष्ट्र-राज्य. संस्थापक अध्यक्ष संजय हाळनोर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्या चौथ्या वर्धापन दिनानिमित्त पुणे टीमने हडपसर येथे केक कापून साजरा करण्यात आला.विश्वराज सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल, लोणी काळभोर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत आरोग्य तपासणी आणि चालकांसाठी विमा पॉलिसी’ या शिबिराचे उद्घाटन आमदार चेतन तुपे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार चेतन तुपे म्हणाले, दरवर्षी रस्ते अपघातात अनेक जण मृत्युमुखी पडत असतात. त्या धर्तीवर राज्यभरात सध्या रस्ते सुरक्षा सप्ताह साजरा होत असून चालकांच्या आरोग्याची काळजी आणि विमापॉलिसी हा महत्वाचा विषय आहे. या विषयासाठी ही संस्था काम करत असून हे प्रयत्न उल्लेखनीय आहेत आणि त्यासाठी मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो.

यावेळी नगरसेवक योगेश बापु ससाणे, मारुती आबा तुपे,नगरसेविका वैशाली बनकर,जंगले ताई, स्वि.सदस्य अविनाश काळे, स्वि.सदस्या संजीवनी जाधव,स्वि.सदस्य संजय तात्या शिंदे,मनोज आबा घुले, सागर राजे भोसले, बाळासाहेब न्हावले,सुनील दादा बनकर, योगेश सुयंवशी, गणेश जगताप,हडपसर वाहतूक पोलीस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा,हडपसर पोलीस ठाण्याचे चौधरी साहेब,डिसोझा साहेब तसेच संस्थेचे पदाधिकारी अतीश सोनवणे, गणेश बोराटे, गोरक्ष मदने, बाबासाहेब करांडे, विशाल शेवाळे, सतिश काळे,पवन काळे,योगेश जगताप, संतोष जाधव, सुनील शिंदे,त्र्यंबक मस्के , उमेश झेंडे,संतोष नागावडे,अमोल बोराटे,आयुबभाई पठाण,संदिप खारकर,नवनाथ कदम, थोरात ताई यासह पुणे जिल्हय़ातील संस्थेचे अनेक सभासद व नागरिक उपस्थित होते.






