एकवट व कंत्राटी कामगारांच्या किमान वेतनाच्या अंमलबजावणी करता २५ जानेवारी रोजी आंदोलन

पुणे : पुणे महानगरपालिकेच्या सर्व खात्यामध्ये गेली १४ ते १५ वर्षापासून ७५०० कंत्राटी कामगार अतिशय तुटपुंज्या वेतनावर काम करत आहेत. महाराष्ट्र शासनाने दि. २४/२/२०१५ रोजी जारी केलेल्या लेखी अधिसुचनेनुसार कंत्राटी कामगांराना किमान वेतन देणे बंधनकारक आहे व त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. तरी देखील पुणे महानगरपालीकेच्या प्रशासनाने अमंलबजावणी केली नसल्याने पुणे महानगरपालिका कामगार युनियन च्या वतीने २५ जानेवारी रोजी पुणे महानगरपालिके बाहेर आंदोलन करण्यात येणार आहे. An agitation on January 25 to implement the minimum wage for contract workers
महाराष्ट्र शासनाने दि. २४/२/२०१५ रोजी जारी केलेल्या लेखी अधिसुचनेनुसार कंत्राटी कामगांराना किमान वेतन देणे बंधनकारक आहे व त्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले होते. तरी देखील पुणे महानगरपालीकेच्या प्रशासनाने अमंलबजावणी केली नाही. पुणे महानगरपालिका कामगार युनियन ( मान्यताप्राप्त) च्या सततच्या लेखी वा चर्चेच्या पाठपुराव्यामुळे किमान वेतन देण्याचा ठराव दि. १९/५/२०२० रोजी मा. स्थायी समितीने केला होता तरी देखील किमान वेतन देण्यात आलेले नाही.
तसेच पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागात गेली ३० ते ३५ वर्षापासून अतिशय तुटपुंज्या एकवट मानधनावर १५०० बालवाडी शिक्षिका व सेविका कामे करत आहेत. सदर बालवाडी शिक्षिका व सेविका वयोपरत्वे निवृत्त झाल्या तसेच काही मृत्यू पावल्या तरी त्याना व वारसांना पेन्शन व कोणतीच आर्थिक मदत दिली जात नाही. म्हणून सदर बालवाडी शिक्षिका व सेविका यांना वेतन वाढीच्या फरकाची रक्कम त्वरित अदा करा व त्यांना शासनाच्या किमान वेतनाप्रमाणे वेतन व इतर सवलती द्या अशी मागणी कामगार युनियनच्या वतीने करण्यात आली आहे.
सदर कंत्राटी कामगांराच्या मागण्या खालील प्रमाणे
१) दि. २४/२/२०१५ च्या शासन निर्णयानुसार वेतनाची अंमलबजावणी त्वरित करावी. २) स्थायी समितीने मान्यता दिल्या नुसार दि. १/४/२०२० पासून शासन निर्णयाची अंमलबजावणी करून फरकाची रक्कम अदा करावी. ३) प्रत्येक महीन्याचे वेतन वेतन पावतीसह १० तारखेच्या आत दिले पाहिजे.४) बालवाडी शिक्षिका व सेविका यांना वेतन वाढीच्या फरकाची रक्कम व किमान वेतना प्रमाणे वेतन अदा करावे. ५) कंत्राटदाराने कंत्राटी कामगांराना वेतन अदा न केल्यास मुख्य मालक या नात्याने महानगरपालिकेने वेतन अदा करावे.

६) घोलेरोड व औंध क्षेत्रीय कार्यालयातील कंत्राटी कामगारांना थकीत वेतन त्वरित द्या. ७) पी. एफ./ यु. ए. एन. क्रमांक अद्यावत करून त्याची नोंद देण्यात येणाऱ्या वेतन पावतीवर करावी. ८) सर्व कामगाराना ई. एस. आय. कार्ड व सुरक्षेची साधने देण्यात यावी. ९) एकवट व कंत्राटी कामगांराना पुणे महानगर पालिकेच्या कायम सेवेत समाविष्ट करून घ्यावे. वरिल सर्व मागण्यासाठी दि. २५ जानेवारी २०२१ रोजी दुपारी २.०० वाजता पुणे महानगरपालिका भवन समोर होणाऱ्या प्रचंड आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी युनियनचे कार्यालय, श्रमिक भवन, शिवाजी नगर, याठिकाणी सर्व कंत्राटी कामगाराना जमा होण्याचे आवाहन युनियनचे अध्यक्ष कॉ. उदय भट, जनरल सेक्रेटरी कॉ. मुक्ता मनोहर यांनी केले आहे.






