पुणे शहर

कन्नड संघाचा फलक केला भगवा… कर्नाटक विरोधात ब्राह्मण महासंघाचे आंदोलन

पुणे : कन्नडगिकांना जर मराठा आणि भगवा चालत नसेल तर आपण तरी महाराष्ट्रात कन्नडी संस्थांना का काम करू द्यावे. असे म्हणत ब्राह्मण महासंघाच्या वतीने कर्वे रस्ता परिसरातील एरंडवणा येथील कर्नाटक हायस्कूल येथील कन्नड शिक्षण संस्था च्या बोर्ड वर जय महाराष्ट्र चे बॅनर लावत बोर्ड भगवे केले. यावेळी शाळेबाहेर त्यांचे बोर्ड फाडले, इतर 4 बोर्ड वर भगव्या शाईने जय महाराष्ट्र लिहिलं आहे.(Saffron made the plaque of Kannada Sangh … Movement of Brahmin Federation against Karnataka)

बेळगाव महापालिकेसमोर कन्नक रक्षक संघटनेने लाल पिवळा ध्वज बेकायदेशीररित्या लावला आहे. हा ध्वज त्वरित हटवावा या मागणीसाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने मोर्चा आयोजित केला होता. मात्र या मोर्चाला बेळगाव जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतर शिवसेने सह विवीध संघटना आक्रमक झाल्या आहेत. कर्नाटक सरकारचा निषेध म्हणुन ब्राह्मण महासंघाच्या वतीने आंदोलन करण्यात आले.

Img 20210116 wa0007

ब्राह्मण महासंघाचे संस्थापक अध्यक्ष आनंद दवे म्हणाले, कन्नड संघ संस्थेने येणारे शैक्षणिक वर्ष चालू होय पर्यंत कायदेशीर कारवाई पूर्ण करून संस्थेचे कन्नड हे नाव काढून टाकावे आणि आमच्या भावना कर्नाटक सरकार ला पोहोचवाव्या अस पत्र आम्ही त्यांना देत आहोत  बाजीराव रोड येथील कर्नाटक बँक वर आम्ही ऑगस्ट महिन्यात लावलेले शिवाजी महाराजांचे बॅनर आज पण कायम आहेत… ते राहतीलच आणि हे सुधरतीलच
ना केवळ आंदोलन केल, त्यांच्या मुख्य कार्यालयात जाऊन कन्नड संघाच्या नावावरच जय महाराष्ट्र चा बोर्ड लावला.

1609323038998 udyam bank big advt 30 dec 2020 scaled

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये