पुणे शहर

मातंग समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी  शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधानांना भेटणार : रामदास आठवले

पुणे :  अखिल महाराष्ट्र मातंग समाज ( मातंग स्पिक्स) च्या वतीने आज घेण्यात आलेल्या राज्यव्यापी परिषदेत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मातंग समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण केंद्र आणि राज्य सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे म्हंटले आहे. meet the Prime Minister with a delegation to solve the problems of the Matang community

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळावा, मातंग समाजाला स्वतंत्र आरक्षण मिळावे अशा  मातंग समाजाच्या विविध मागण्यांसाठी मातंग समाजाच्या प्रमुख नेत्यांसह शिष्टमंडळ घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लवकरच भेटणार असल्याचे आठवले यांनी आजच्या परिषदेत जाहीर केले.

मातंग समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी  महाराष्ट्रातील सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते, संघटनांचे पदाधिकारी एकत्र आले आहेत. आज या सर्वांच्या वतीने पुण्यात राज्यव्यापी परिषद आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आठवले यांची प्रमुख उपस्थिती होती. मातंग समाजासाठी अतिशय महत्त्वाचे असणारे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे विकास महामंडळ सहा वर्षे बंद आहे .ते लवकरच चालू करण्यासाठी आपण आग्रही रहाणार असल्याचे आठवले यांनी सांगितले. 

यावेळी समाजाच्या मागण्यांचे निवेदन आठवले यांना देण्यात आले. बैठकीच्या अध्यक्षस्थानी हनुमंत साठे हे होते. प्रास्ताविक राष्ट्रवादीचे विजय डाकले यांनी केले.
बाळासाहेब भांडे, अनिल हातागळे, मनोज कांबळे, माजी आमदार राम गुंजीले, नगरसेवक सुभाष जगताप, नगरसेवक अविनाश बागवे, दिलीप आगळे, सुकुमार कांबळे , रवींद्र दळवी यांनी भाषणे केली.
मिलिंद आवाड, सचिन जोगदंड, निलेश वाघमारे , संदिपान झोंबाडे, काशिनाथ आल्हाट व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते..

Img 20210116 wa0007
1609323038998 udyam bank big advt 30 dec 2020

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये