पुणे शहर, जिल्हा

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांना जयंतीनिमित्त दुचाकी रॅली द्वारे अभिवादन !

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, पुणे जिल्हा यांच्या वतीने आयोजन

पुणे : अपराजित योद्धे श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्या 326 व्या जयंतीनिमित्त अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, पुणे जिल्हा यांच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिर ते शनिवार वाडा अशी भव्य दुचाकी रॅली आयोजित करण्यात आली होती. या रॅलीच्या माध्यमातून श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे शौर्य, पराक्रम आणि कर्तृत्वाला अभिवादन करण्यात आले.

Img 20260222 wa00063491038201882637992



शूरवीर झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पुतळ्याला अभिवादन करून रॅलीची सुरुवात झाली. भगवे ध्वज, पारंपरिक वेशभूषा आणि जयघोषांनी रॅलीचा संपूर्ण मार्ग उत्साहाने भारून गेला होता. मराठा साम्राज्याचा दरारा दूरवर निर्माण करणाऱ्या आणि आपल्या युद्धकौशल्याने इतिहासात अजरामर ठरलेल्या श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमाचे स्मरण या रॅलीच्या माध्यमातून करण्यात आले.

यावेळी पेशवे वंशज पुष्कर पेशवा, आमदार हेमंत रासने, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. गोविंद कुलकर्णी, सिने कलाकार ज्ञानेश वाडेकर, सुनील गोडबोले, नगरसेवक श कुणाल टिळक, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, संदीप खर्डेकर यांच्यासह विविध मान्यवर, आयोजक आणि समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. हे रॅली चे सलग पाचवे वर्ष आहे व प्रत्येक वेळी पुणे जिल्ह्यातून मोठ्या संख्येने पेशवे प्रेमी यात सहभागी होत असतात.

या कार्यक्रमाचे आयोजनामध्ये पुणे जिल्हा अध्यक्ष मंदार रेडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष केतकी कुलकर्णी, प्रसाद गिजरे (अध्यक्ष उद्योजकता विकास आघाडी), कमलेश जोशी, अभिनव पाठक,राहुल जोशी, वेदिका सदावर्ते (उपाध्यक्ष महिला आघाडी), अक्षय जोशी, अनिरुद्ध पळशीकर, अश्विनी कौसडीकर (अध्यक्ष social media), देवश्री बोधनी, सुरेश कुलकर्णी, यामिनी मठकरी, सुहास पानसरे, हेमंत कासखेडीकर व अनेक पदाधिकारी आवर्जून सहभागी झाले व यशस्वी करून दाखवला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये