महाराष्ट्रसांस्कृतिक

राष्ट्र सेवा दलातर्फे ‘महात्मा फुले विचार आणि कार्य’ विषयावर दीर्घ काव्य स्पर्धा

पुणे : महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जन्मदिनानिमित्त राष्ट्र सेवा दल, पुणे आणि समाज साहित्य प्रतिष्ठान, सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दीर्घ लेखन काव्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ‘फुले यांचे विचार आणि कार्य’ या विषयावर ही स्पर्धा घेण्यात येत असून 30 सप्टेंबर 2026 पर्यंत स्पर्धेसाठी कविता पाठविण्याचे आवाहन राष्ट्र सेवा दल दिवाळी अंक संपादक तथा अ. भा. साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ कादंबरीकार लक्ष्मीकांत देशमुख आणि समाज साहित्य प्रतिष्ठानचे मार्गदर्शक कवी अजय कांडर यांनी केले आहे.

Img 20260222 wa00063491038201882637992


पहिल्या तीन विजेत्यांना अनुक्रमे पाच हजार, तीन हजार आणि दोन हजार रुपये तसेच उत्तेजनार्थ एक हजाराची तीन पारितोषिके दिली जातील. या सर्व विजेत्यांना स्मृतीचिन्ह, शाल आणि ग्रंथ भेट देण्यात येणार आहे. पहिल्या तीन पारितोषिक विजेत्या कविता किंवा फार दीर्घ असल्यास त्यांचा काही भाग राष्ट्र सेवा दलाच्या 2026 च्या दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
स्पर्धेचे नियम :

  1. कविता किमान 20 पानांची असावी. त्यापेक्षा कितीही मोठी चालेल.
    (टीप : मराठीत दीर्घ कविता लिहिली गेली आहेच. त्यामुळे ज्यांना त्याविषयी काहीच माहिती नाही त्यांनी “20 ओळी की 20 पाने” असे प्रश्न संयोजकांना फोन करून विचारू नयेत.)
  2. पंधरा ते वीस ओळींच्या दरम्यान एक पान असेल असे समजावे. छंदोबद्ध कविता असेल तर पाच कडव्यात एक पान असेल असे समजावे.
  3. कवितेच्या टपालावर कवीने आपला मोबाईल नंबर स्पष्ट वाचता येईल असा लिहावा.
  4. कविता पानाच्या एकाच बाजूला, वाचता येईल अशा अक्षरात लिहून किंवा टाईप करून कुरियर किंवा पोस्टाने एका प्रतीत पाठवावी.
    कविता पाठविण्याचा पत्ता :
    बुद्धभूषण रवींद्र बगाडे
    द्वारा
    राष्ट्र सेवा दल
    मध्यवर्ती कार्यालय
    सिंहगड रोड
    पर्वती
    पुणे 411030

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये