पुणे शहर

दीपक मानकर यांना कलियुगातील कर्ण पुरस्कार प्रदान

पुणे :” कलियुगातील कर्ण पुरस्कार ” प्रदान समारंभ आज  श्रीनाथ टॉकीज चौक येथील मांगल्य कार्यालय, येथे संपन्न झाले. कोरोना काळातील समाजसेवी काम करणाऱ्या मान्यवरांचा  सन्मान करण्यात आला. माजी उपमहापौर दीपक मानकर, बाळासाहेब  दाभेकर,  डॉ. गौतम छाजेड,  महेंद्र पवार, राजेंद्र परदेशी, जावेद खान यांना ” कलीयुगातील कर्ण पुरस्कार  महापौर मुरलीधर मोहोळ व प्रसिद्द अभिनेता, दिग्दर्शक प्रवीण तरडे याच्या हस्ते  देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  दत्ता सागरे  यांनी केले. अभय छाजेड या प्रसंगी उपस्थित होते.

या प्रसंगी आलेल्या पाहुण्यांचे शॉल , श्रीफळ, व स्मृतिचिन्ह  श्रीनाथ चौक मित्र मंडळ यांच्या वतीने देऊन सत्कार  करण्यात आले. यावेळी दीवा प्रतिष्ठान तर्फे दीपक  मानकर यांच्या हस्ते जावेद खान यांना त्यांच्या  उत्कृष्ठ  कार्यसाठी 25,000 रुपये रोख देण्यात आले.

Img 20210116 wa0007

आपले मनोगत व्यक्त करताना दीपक मानकर म्हणाले, दानवीर कर्णाच्या नावाने हा पुरस्कार मला आपण दिला आहे याचा आनंद आहे परंतु कर्ण होणे सोपे नाही, त्यासाठी खूप काही भोगावे लागते याची मला जाणीव आहे. त्याच प्रमाणे माझ्या आई ने कायम गोर गरिबांना मदत करण्याचे संस्कार माझ्यावर केले आहे, त्या नुसार काम करण्याचे बळ कायमच मिळत असते असे ते म्हणाले. तसेच या प्रसंगी २१००० कोरोना  पेशंट चे तपासणी निदान व समुपदेशन करणारे डॉ. गौतम छाजेड, महेंद्र पवार वडार वस्ती मध्ये धान्य वाटप करून  गोर गरीब विद्यर्थ्यांच्या शिक्षणात खंड पडूनये म्हणून लॅपटॉप व टॅप चे वाटप केले, तर राजेंद्र परदेशी यांनी कोरोना काळात मंदिर आणि मस्जिद मध्ये संक्रमण रोखण्यासाठी औषध फवारणी केली, व जावेद खान यांनी कोरोना मुळे मृत्यूमुखी  पडलेल्या ४००० व्यक्तींच्या अंतःसंस्काराचे कार्य धडाडीने पार पाडले. श्री बाळासाहेब दाभेकर यांनी सुद्धा या कोरोनच्या काळात भरीव मदत केली. त्या करीता या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त केले.  

1609323038998 udyam bank big advt 30 dec 2020

प्रवीण तरडे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, पुण्यात राजकीय मतभेद आहेत पण मनभेद नाहीत त्यामुळे विविध पक्षातील प्रतिनिधित्व करणारी ही  मंडळी अनेक कार्यक्रमात एकाच व्यासपीठावर असतात. या संकटाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता महापौरांनी भरीव कामगिरी केली, त्याबद्दल त्यांचे आभार.  कलयुगातील कर्ण पुरस्कार आज माझ्या हस्ते या सर्वाना देण्यात आले, हे माझे भाग्य आहे.त्यासाठी या मंडळाचे खूप खूप आभार, तसेच  या कलयुगातील कर्ण पुरस्कार प्राप्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. 

महापौर मुरलीधर मोहोळ आले मनोगत व्यक्त करताना,  कोरोनाच्या सुरवातीपासून आज पर्यंत स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या प्रत्येक घटकाचे आभार व ऋण मानले. समाज कार्य हेच परमोधर्म मानून प्रत्येकाने या संकटाच्या काळात मदतीचा हात देऊन प्रत्येकाने आपल्या परीने जमेल ती मदत केली, दीपक मानकर  यांनी कोरोना च्या काळात अडीच हजार  लोकांना रोज दोनीही वेळेचे जेवण व अठरा हजार लोकांना तीन महिन्याचे राशन दिले, त्या बद्दल  आपले खूप खूप आभार असे महापौर म्हणाले.  या सर्वांचं मनापासून आभार. 

कार्यक्रमाची संकल्पना दत्ता सागरे, कुलदीप कदम यांची होती. 

कार्यक्रमाचे संयोजक कैलास परदेशी, आनंद सागरे, दर्शन कदम यांनी केले तर सूत्रसंचालन मिलिंद कुलकर्णी यांनी केले व राजेंद्र पवार यांनीं सर्वांचे आभार मानले. 

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये