वारजे माळवाडी मध्ये भाजपच्या वतीने गरजू नागरिकांना किराणा किटचे वाटप..

वारजे : भारतीय जनता पार्टी पुणे शहर वतीने आज प्रभाग क्र ३२ वारजे माळवाडीमधील बारा बलुतेदार समाजापैकी चर्मकार , नाभिक , सुतार , पोतराज , गारूडी , तृतीयपंथीय , वारकरी संप्रदाय , ड्रायव्हर , अंध -अपंग , मोलमजुरी करणारे भगिनी आदि १५० गरजू कुटुंबांना किमान १५ दिवस पुरेल इतका कोरडा शिधा किटचे वाटप खडकवासल्याचे आमदार भिमराव तापकीर यांचे हस्ते करण्यात आले . BJP distributes grocery kits to needy citizens in Warje Malwadi.
या किटमध्ये ५ किलो गहू आटा , ३ किलो तांदुळ , १ किलो तुरडाळ , १ किलो साखर , १ किलो बेसन , २५० ग्रॅम चहापावडर , जिरे , मोहरी , मिरची पावडर प्रत्येकी १०० ग्रॅम , बिस्कीट पुडे २ , १ किलो मीठ , २ कपड्याचे साबण , २ अंगाचे साबण या साहित्याचा सामावेश होता .

या वेळी पुणे मनपा शहर सुधारणा समितीच्या अध्यक्ष आनंद रिठे, खडकवासला मतदारसंघाचे अध्यक्ष सचिन मोरे , किर्तनकार धर्मराज महाराज हांडे , पुणे शहर सचिव किरण बारटक्के, रिक्षा आघाडीचे अध्यक्ष अंकुश नवले , एनजीओ आघाडीचे अध्यक्ष डॉ. अजय दुधाने, ह.भ.प. सतीशमामा बोडके , सहकार आघाडी सरचिटणीस अजित देशपांडे ,
तसेच रेश्मा पाटणकर , ऋषिकेश रजावात , अमजद अन्सारी , व्यंकटेश दांगट , किरण साबळे , रेणुका मोरे , वर्षा पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे संयोजन भजपा सहकार आघाडीचे पुणे शहराध्यक्ष सचिन दशरथ दांगट यांनी केले होते .



सध्या लॉक डाऊन मुळे हातावरचे पोट असणाऱ्या नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काम नसल्याने आर्थिक घडी विस्कटल्याने दैनंदिन गरजा भागवताना अनेक नागरिकांना ओढातान करावी लागत आहे. अशा कुटुंबांना मदतीचा हात म्हणून या किराणा किट वाटप उपक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सचिन दांगट यांनी सांगितले.



