पुणे शहर

पंधरा दिवसांपासून लसीकरण केंद्रावर लस नाही ; लस वाटपातही गलिच्छ राजकारण : धुमाळ

पुणे : pune city पंधरा पंधरा दिवस पुणे शहरातील काही लसीकरण केंद्रावर लस पाठवली जात नसल्याने महापालिका प्रशासन व सत्ताधारी भाजप लोकांच्या जीवाशी खेळ खेळत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी केला आहे. No vaccine at the vaccination center for fifteen days;  Dirty politics even in vaccine distribution: Dhumal

महापालिकेतील सत्ताधारी भाजप व प्रशासन लसीचे वाटप करताना दूजाभाव करत असून बऱ्याच लसीकरण केंद्रावर पंधरा दिवसांपासून लसच पाठवण्यात आली नाही. त्यामुळे एकूणच लस वाटपाच्या नियोजनावर प्रश्न चिन्ह निर्माण होत असल्याचे धुमाळ यांनी म्हंटले आहे.

वारजेतील गंगाबाई धुमाळ उद्यानातील लसीकरण केंद्रावर पंधरा दिवसांपासून लस पाठवण्यात आलेली नाही. नागरिक रोज केंद्रावर येऊन लस नसल्याने निराश होऊन परत जात आहेत. त्यामुळे लसीचे वाटप निःपक्षपातीपणे होत नसल्याने शहरातील अनेक भागातील नागरिकांवर प्रशासनाकडून व सत्ताधारी भाजपकडून अन्याय केला जात असल्याचा आरोप धुमाळ यांनी केला आहे.

Img 20210522 wa0203

लसीकरण वाटपाबाबत विचारले असता वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयातील क्षेत्रीय अधिकारी व क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी लस वाटप नियोजन करत असलेल्या अधिकाऱ्यांकडे बोट दाखवत आहेत. त्यांना विचारले तर ते रुबल अग्रवाल यांच्याकडून नियोजन होत असल्याचे सांगत आहेत. एकूणच लस वाटपात जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण करून ठराविक केंद्रावर लस पाठवून लसीकरण वाटपातही गलिच्छ राजकारण केलं जातं असल्याचं धुमाळ यांनी म्हंटले आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये