पुणे शहर
बावधनमध्ये उद्यापासून लसीकरण केंद्र सुरू नगरसेवक किरण दगडे पाटील यांची माहिती

पुणे : पुणे महापालिकेच्या वतीने बावधन खुर्द मध्ये मोफत कोविड-१९ नवीन लसीकरण केंद्राचे उद्घाटन महापौर मुरलीधर मोहोळ आणिआमदार भीमराव तापकीर यांच्या हस्ते ऊद्या (ता.१८ ) रोजी उद्घाटन करून सुरू करण्यात येणार आहे. अशी माहिती स्थानिक नगरसेवक किरण दगडे पाटील यांनी दिली आहे.
नगरसेवक किरण दगडे पाटील यांच्या प्रयत्नातून प्रभाग क्र १० मध्ये स्वामी विवेकानंद जलतरण तलाव, मेडिटेशन हॉल व बॅडमिंटन कोर्ट बावधन खुर्द येथे नवीन कोविड १९ लसीकरण केंद्र सुरु होत आहे.

किरण दगडे पाटील म्हणाले, या परिसरातील नागरिकांसाठी पुणे महापालिकेतर्फे वयोमर्यादा 45 वरील…1st dose राहिलेले किंवा 2nd dose घेण्यासाठी 84 दिवस पूर्ण झालेले सर्व नागरिक उद्या याठिकाणी लस घेऊ शकतात.






