पुणे शहर

कोथरूडमध्ये महीला पोलिसांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन

पुणे : झाशीची राणी लक्ष्मीबाई पुण्यतिथी आणि राजमाता जिजाऊसाहेब भोसले पुण्यतिथी निमित्त कोथरूड पोलीस ठाणे , पुणे शहर येथे महिला पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.

१० महिला पोलीसांनी या शिबीराचा लाभ घेतला.
यावेळी वरिष्ठ पोलीस निरिक्षक मेघशाम डांगे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.यावेळी मोनाली ननावरे , विजया घोडके , मंगल पुंडे , श्रद्धा म्हस्के , सोनाली भालेराव , अमीना बालशाह , सोनम भगत , ललीता ओतारी , नंदीनी कोंढाळकर , सारिका गुंजाळ आदी महिला पोलीस कर्मचारी उपस्थित होते.

Img 20210522 wa0203

डाॅ. सरिता साखळकर यांनी या उपक्रमाचे मार्गदर्शन केले. तर साई लॅब , कोथरूड तर्फे बीपी , शुगर , एच बी , ब्लड ग्रुप तपासण्या करण्यात आल्या.कुणाल दिलीप भगत यांनी कायदा व सुव्यवस्थेसाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीस भगिनींना कामाचा ताण असल्याने वैयक्तिक आरोग्याकडे होत असलेले दुर्लक्ष या भावनेतून या शिबीराचे आयोजन केले असल्याचे सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये