पुणे शहर

महापौर मुरलीधर मोहोळ यांचा भाजप प्रदेशाध्यक्ष,आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडून सत्कार..

पुणे : पुण्यनगरीचे प्रथम नागरिक महापौर मुरलीधर मोहोळ यांनी कोरोना काळात उत्तम काम केले असून त्यांच्या कार्याचे विरोधकांनी सुद्धा कौतुक केले. अश्या कर्तृत्ववान महापौरांची राष्ट्रीय महापौर परिषदेच्या उपाध्यक्षपदी निवड होणे ही अभिमानाची बाब आहे. असे गौरवोद्गार भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी काढले.

अखिल भारतीय महापौर परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी पुणे शहराचे महापौर मुरलीधर मोहोळ यांची  निवड करण्यात आली  असल्याने त्यांचा चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला. यावेळी संघटन सरचिटणीस राजेश पांडे, प्रदेश सचिव अरविंद निलंगेकर, शहर प्रवक्ता संदीप खर्डेकर, कोथरूड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मोहोळ म्हणाले, अखिल भारतीय महापौर परिषदेच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी झालेली माझी निवड हा पुणेकरांचा बहुमान असून मी राष्ट्रीय स्तरावर ही पुणेकरांची मान उंचावेल असे काम करेन.

Img 20210818 wa0002

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये