गरज ही जशी शोधाची जननी आहे तशीच ती उपक्रमाची पण जननी आहे – भाजप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील

अंकूर प्रतिष्ठानच्या १३ वर्षे सातत्याने चालणाऱ्या देणे समाजाचे समाजासाठी उपक्रमात व्यक्त केले मत
पुणे : अंकूर प्रतिष्ठान चे अध्यक्ष कुलदीप सावळेकर व स्विकृत नगरसेविका अँड् सौ मीताली कुलदीप सावळेकर यांच्या मार्फत गेली १३ वर्षे सातत्याने चालणा-या अंकूर प्रतिष्ठानच्या देणे समाजाचे समाजासाठीचा १३व्या वर्षीचा उपक्रमाचा समारोप प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला व कोरोनाच्या ओसरत्या संकट काळात संस्थांची दिवाळी गोड झाली.
या उपक्रमात यावर्षी १७०० हून अधिक नागरिकांनी त्यांच्या घरच्या जुन्या परंतु वारपण्यायोग्य वस्तू आणून दिल्या.कोरोना काळात अनेकांना आर्थिक मदत देणे शक्य नव्हते परंतु वस्तु स्वरूपाची मदत देणे सहज शक्य होते व अनेक संस्थांना त्याचा उपयोग झाला. सदर उपक्रमात चंद्रकांत पाटील यांचे स्वागत शंख वादनाने करण्यात आले. पांचजज्ञ ग्रुप तसेच २ वर्षाच्या अनय इनामदारने शंख वादन केले.

पाटील यांनी संपूर्ण उपक्रमाची माहिती घेतली, पाहाणी केली, संस्थांची विस्तृत माहिती जसे की त्यांचे कार्यक्षेत्र, कामाचे स्वरूप इ.सदर उपक्रमाचे व त्याच्या वेगळेपणाचे कौतुक तर केलेच व अश्या प्रकारचे उपक्रम अधिक प्रमाणात व्हायला हवे असे ही सांगितले तसेच चंद्रकांत पाटील म्हणाले,” गेल्यावर्षी जेव्हा मला या उपक्रमाची माहिती मिळाली तेव्हा कोरोनाचे संकट असल्यामुळे लोकांना या उपक्रमाची यावर्षी सर्वाधिक आवश्यकता असल्यामुळे कोणताही खंड पडू न देता सर्व खबरदारी घेऊन हा उपक्रम राबवावा असा मी आग्रह धरला आणि गेल्यावर्षी हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.



तसेच यावर्षी सदर उपक्रमात मी माझ्या संपर्कातील काही नवीन मंडळींना देखील जोडून दिले व त्यापैंकी काहींनी वस्तू रूपात व काहींनी स्वयंसेवक म्हणून योगदान दिले. रविवार पेठेतील एका कापड दुकानदारांनी ११ पोती नवे कपडे दिले ज्यामुळे संस्थांमधील मुलांच्या चेह-यावर निश्चितपणे एक हास्य उमलणार आहे ज्यायोगे आपल्यालाही एक समाधान लाभणार आहे. *हा ख-या अर्थाने समाजाच्या योगदानातून सर्वांच्या सहभागातून अत्यंत उपयुक्त व समाधान देणारा उपक्रम सलग १३ वर्षे करणा-या अंकूर प्रतिष्ठानच्या सर्व टीमचे व आमच्या भा ज पाच्या अनेक वर्ष सक्रीय असलेल्या व ज्यांची ही मूळ संकल्पना आहे त्या श्री कुलदीप सावळेकर व स्विकृत नगरसेविका अँड् मीताली कुलदीप सावळेकर यांचे मी मनापासून कौतुक करतो व या उपक्रमात तसेच सहभागी संस्थांना अजून काय मदत देता येईल यासाठी मी स्वत: सर्वतोपरी प्रयत्न करेन”
तसेच अँड् मीताली कुलदीप सावळेकर यांनी प्रास्ताविक केले त्यावेळी त्यांनी या उपक्रमाची जन्मकथा सांगितली. तसेच उपक्रमाचा उद्देश, उपयुक्तता, वैशिष्ट्य व लोकांचा वाढता सहभाग याविषयी सांगितले पाटील यांनी या समारोपाला वेळ दिल्या बद्दल तसेच सक्रीय सहभागाबद्दल आनंद व्यक्त करत त्यांचे विशेष आभार मानले.
सदर उपक्रमातील संपूर्ण महाराष्ट्रातील बीड येथील शांतीवन, पेण मधील सर्वोदय, अहमदनगर येथील सावली, राशीन येथील संकल्प संस्था, बीड येथील आजोळ, तसेच भूम, सोलापूर, पुणे, सहकारनगर, कर्वेनगर इत्यादी सर्व मिळून सुमारे ४० हून अधिक संस्थांना यावर्षी वर्षभर पुरेल एवढी मदत करण्यात आली.
यावेळेला सदर उपक्रमात मा नगरसेवक दीपक पोटे, नगरसेविका मंजूश्री खर्डेकर, नगरसेविका माधुरी सहस्त्रबुध्दे, रा स्व संघाचे उल्हास जोशी, संदीप खर्डेकर, राघवेंद्र मानकर, कोथरूड मंडलाचे अध्यक्ष पुनीत जोशी, विठ्ठल मानकर, समीर ताडे, अँड् प्राची बगाटे, निलेश गरूडकर, बाळासाहेब धनवे, राजेंद्र येडे, सुनील होलबोले, अनुराधा येडके, हर्षदा फरांदे, सौरभ अथनिकर, गिरीष भेलके, दिनेश माथवड, दीपत पवार, तसेच भा ज पा चे अनेक शहर, मंडल प्रभाग कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
त्याचप्रमाणे सामाजिक क्षेत्रातील व सोसायटीमधील पदाधिकारी न नागरिक उपस्थित होते.
यावेळी म न पाच्या निवडणूकाच्या पार्श्वभूमीवर जेष्ठ नागरिक महिलांकडून कमळाचे रोप देऊन सन्मान करण्यात आला व शत प्रतिशत भाजपाचा नारा देत शत पतिशत भाजपा साठी शुभेच्छा देण्यात आल्या.सूत्र संचालन कुलदीप सावळेकर यांनी केले व आभार निलेश गरूडकर यांनी मानले



