पुणे शहर

विमानाने येऊन पुण्यात घरफोडी करणाऱ्या दोघांना अटक

पुणे : विमानाने येऊन पुण्यात घरफोडी करणाऱ्या उत्तर प्रदेशातील दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट चारने अटक केली आहे. त्यांच्याकडून विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणत सहा लाख 37 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परवेज शेर मोहम्मद खान (वय 43) आणि तस्लीम अरिफ समशुल खान (वय 23, रा. दोघेही उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

परवेज हा सराईत असून त्याच्यावर पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात नऊ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला यापैकी काही गुन्ह्यात शिक्षा देखील झाली आहे. आरोपी हे विमानाने अथवा कधी-कधी ट्रॅव्हल्सने येऊन घरफोडी करत होते, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक जयंत राजूरकर यांनी दिली.

Img 20211129 wa0128

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये