पुणे शहर

बावधनमधील भव्य बालजत्रेत विविध खेळांबरोबर मुलांनी घेतला खाद्य पदार्थांचा आस्वाद ; किरण दगडे पाटील यांच्या वतीने आयोजन..

बावधन : मोठे पाळणे, आगिनगाडी, ड्रॅगन ट्रेन, गाड्यांची टक्कर अशा अनेक खेळांचा आनंद लुटत बालगोपाळांनी घेतला भेळ,पाणीपुरी बरोबर आपल्या आवडीच्या पदार्थांचा आस्वाद. निमित्त होते नगरसेवक किरण दगडे पाटील व सरपंच सौ. पियुषा किरण दगडे पाटील यांनी आयोजित केलेल्या भव्य बालजत्रेचे.

या बालजत्रेचे भाजपचे पुणे शहर सरचिटणीस राजेश पांडे  हस्ते शनिवारी उद्घाटन करण्यात आले. यावेळी नगरसेवक किरण दगडे पाटील व सरपंच सौ. पियुषा किरण दगडे पाटील व भाजप पदाधिकारी उपस्थित होते. कोथरुड, बावधन परिसरात एवढया मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच बालजत्रा आयोजित करण्यात आली असून त्यामुळे मुलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. या बालजत्रेत सर्व गोष्टी मोफत ठेवण्यात आल्या आहेत.

Img 20211226 wa0101

पहिल्याच दिवशी कोथरुड, बावधन मधील 5000 बालकांनी या बालजत्रेत सहभाग घेतला व विविध खेळांची मजा घेतली. या बालजत्रेत आलेल्या मुलांमध्ये चैतन्य निर्माण झाल्याचे पाहायला  मिळाले. कोणाला मोठ्या पाळण्यात बसायचे होते तर कोणाला गाड्यांची टक्कर खेळायची होती, कोणी ड्रॅगन ट्रेन मध्ये बसण्यासाठी उत्सुक होते. बऱ्याच महिन्यानंतर मुलांना अशा भव्य बाल जत्रेचा अनुभव घेता आल्याने मनाला समाधान मिळाल्याची भावना आयोजक नगरसेवक किरण दगडे पाटील व सरपंच पियुषा किरण दगडे पाटील यांनी व्यक्त केली.

Img 20211129 wa0128

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये