पुण्यात मनसेचे शिष्टमंडळ भाजप कार्यालयात भेटीला… नवीन राजकीय समीकरणाची नांदी ?

पुणे : पुणे शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने आज भाजपच्या नवीन शहर कार्यालयाला भेट दिली. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी भेटीचे आमंत्रण दिले होते. परस्परांना येत्या महानगरपालिका निवडणुकीसाठी यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या. अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ट्विटरवरुन ही माहिती दिली आहे.
आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसे आणि भाजपची युती होणार की नाही याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली असतानाच मनसे च्या शहारातील नेत्यांनी भाजप कार्यालयात जाऊन एकमेकांना शुभेच्छा दिल्याने युतीच्या चर्चांना उधाण आले आहे

भाजपने कॉग्रेस, राष्ट्रवादी सह प्रत्येक पक्षाला कार्यालयात भेटीगाठी करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भाजप कार्यालयातील भेट ही याचाच भाग असल्याचे मनसेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
यावेळी भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे, मनसे महिला शहराध्यक्षा वनिता वागसकर, राज्य उपाध्यक्ष गणेश सातपुते, रणजित शिरोळे व श्री. बाळा शेडगे, सरचिटणीस किशोर शिंदे व हेमंत संभूस, राज्य सचिव व प्रवक्ते योगेश खैरे, महिला जिल्हाध्यक्षा सुशिला नेटके आदी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.









