पुणे शहर

या चित्रपटाबाबत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे संदीप खर्डेकर यांची तक्रार..

पुणे : whatsapp वर एकाने फॉरवर्ड केलेला नाय वरण भात लोन्चा ,कोण नाय कोन्चा  ह्या महेश मांजरेकर दिग्दर्शित चित्रपटाचा ट्रेलर पहिला आणि  मन हादरले. अनेक आक्षेपार्ह दृश्य त्यात दाखवण्यात आले असून त्याला चित्रपट परीक्षण मंडळाने मान्यता काही दिली असा प्रश्न पाडतो, त्यामुळे प्रदर्शनपूर्व हा चित्रपट पाहून योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याकडे केली आहे.

खर्डेकर यांनी म्हंटले आहे की, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली किंवा जळजळीत सत्य दाखवण्याच्या नादात स्त्रियांची अवहेलना केल्याचे सकृतदर्शनी ट्रेलर वरून दिसत आहे. चित्रपट परीक्षण मंडळाने एवढ्या शिव्यांनी भरलेल्या चित्रपटाला मान्यता दिली कशी हा प्रश्न आहेच पण त्यासोबतच लहान मुलांना बाबत ही चुकीची दृश्य दाखवण्यात आली आहेत व ते पाहणे वेदनादायक आणि संतापजनक आहे.

तरी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी प्रदर्शनपूर्व हा चित्रपट बघावा व यातील गैर प्रसंगांवर आक्षेप नोंदवावा किंवा चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्यास सेन्सर बोर्डास सूचना द्याव्यात अशी मागणी खर्डेकर यांनी केली आहे.

Screenshot 20211227 1402344603556305344739789
Img 20220105 wa00031311456043270984558

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये