नंदुरबार येथे रेल्वे स्थानकाजवळ गांधीधाम एक्स्प्रेसला लागली आग..

नंदूरबार : नंदुरबार येथे रेल्वेस्थानकाजवळ गांधीधाम express ला आज सकाळी आग लागल्याची घटना घडली आहे. स्थानकामध्ये प्रवेश करीत असताना स्थानकापासून ३०० ते ४०० मीटर लांब असल्याने रेल्वेचा वेग कमी होता त्यामुळे आग लागताच क्षणी रेल्वे थांबवली गेली व प्रवाशांना लगेच उतरविण्यात आले.
अचानक लागलेल्या आगीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावण निर्माण झाले होते. या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हाणी नाही झाली. प्रवाशांच समान मात्र आत मध्येच राहिल्याने त्याचे नुकसान झाले आहे .
आगीचे कारण अजून आद्यप अस्पष्ट आहे. आग ही पेंट्रीच्या डब्याला लागली आहे नंतर ती आग पसरत AC डब्या पर्यंत पसरत गेली. आग भीषण असल्याने ती विझवण्यासाठी नगरपालिका प्रशासनाचे ४ बंब बोलावण्यात आले होते . ही रेल्वे गांधीनगरहून पुडीला जात होती. घटना घडल्यानंतर रल्वे प्रशासनचे वरिष्ठ अधिकारी व जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले होते.



