भाजपचे अनेक आमदार आमच्या संपर्कात: नवाब मलिक

पुणे : भारतीय जनता पक्ष निश्चितपणे फुटेल. भाजपचे अनेक विद्यमान आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.
नवाब मलिक म्हणाले, ”चंद्रकांत पाटील यांनी आपल्या पक्षाची काळजी करावी. तुमचा पक्ष लवकरच फुटणार आहे. त्यामुळे काळजी घ्यावी. भाजपचे अनेक विद्यमान आमदार नाराज आहे. ते पक्षातून बाहेर पडण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यामुळे आगामी काळात महाराष्ट्रात भाजप पक्ष निश्चितपणे फुटेल. चंद्रकांत पाटील यांनी इतरांची चिंता करण्यापूर्वी भाजपची चिंता करावी. हे आमदार भाजपमधून बाहेर पडण्याची कुणकुण लागल्यामुळेच भाजपकडून आमच्या मित्रपक्षांबाबत वक्तव्ये केली जात आहेत. परंतु, आगामी काळात भाजपमध्ये नक्की फूट पडेल, असा दावा नवाब मलिक यांनी केला.”

मालेगावमधील काँग्रेसच्या 28 नगरसेवकांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधला होता. त्यावर नवाब मलिक यांनी प्रत्यूतर दिले.



