पुणे शहर

पुण्यात शिवसैनिकांचा राडा; किरीट सौमय्या जखमी

पुणे : पुण्यात शिवसैनिक आक्रमक पवित्र्यात आले असून पुणे महापालिकेत आज भाजप नेते किरीट सोमय्या आले असताना शिव सैनिकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे सोमय्या यांना महापालिकेतून काढता पाय घ्यावा लागला. दरम्यान किरीट सौमय्या महापालिकेच्या पायरीवर पडल्याने जखमी झाले असून त्यांना संचेती रुग्णालयात नेण्यात आले आहे. या प्रकरणानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी जशास तसे उत्तर देऊ असा इशारा दिला आहे.

शनिवारी भाजप नेते किरीट सोमय्या पुणे महापालिकेत आले असताना शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी सोमय्या यांच्या गाडी भोवती गर्दी केली. यावेळी सोमय्या यांनी गाडीतून खाली न उतरता गाडी महापालिकेच्या प्रवेश दाराने बाहेर नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी सोमय्या यांना शिवसैनिकांकडून धक्काबुक्की झाली असून ते महापालिकेच्या पायऱ्यांवर पडल्याने जखमी झाले आहेत. त्यांना उपचारा साठी संचेती हॉस्पिटल येथे नेण्यात आले आहे. मात्र आक्रमक झालेले संजय मोरे सोमय्या यांच्या गाडी समोर आडवे पडल्याने तणाव निर्माण झाला होता. मात्र पोलिसांनी प्रसंगावधान राखत मोरे यांना दूर करीत सोमय्या यांच्या गाडीला मार्ग मोकळा करून दिला.

शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे म्हणाले, सर्व भ्रष्टाचारा वर आरोप करणारे भाजपचे किरीट सोमय्या त्यांना पुणे मनपातील भ्रष्टाचारावर आपण का बोलत नाही याविषयीचे निवेदन द्यायचे होते. मात्र सोमय्या यांनी येथुन पळ काढला आहे. पुणे मनपातील भ्रष्टाचारांचे पत्र देउन ईडी चौकशीची मागणी करण्यासाठी आज आम्ही महापालिकेत जमलो होतो.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये