पुणे शहरराजकीय

गिरीश बापट यांचे प्रशांत जगतापांना आव्हान १६ मार्चला भेटू…

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना देखील १६ मार्चला भेटू असं आव्हान भाजप खासदार गिरीश बापट  यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांना दिले आहे. पुण्यातील भाजपचे १६ नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं जगताप यांनी म्हटलं होतं. या पार्श्वभुमीवर बापट यांनी जगतापांना आव्हान दिले आहे.

गिरीश बापटांनी राष्ट्रवादी काँग्रेसला डिवचलं असून त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस हा पश्चिम महाराष्ट्रापुरता पक्ष असल्याचं म्हटलं आहे. राष्ट्रवादीत दोन चार लोकचं निर्णय घेतात. तो पक्ष परिवारवादी पक्ष आहे, अशी टीका बापट यांनी केलं आहे.

बापट यांनी यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रशांत जगतापांना आव्हान दिलं आहे. 15 मार्चला 16 नगरसेवक भाजपातून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येणार असल्याचा दावा प्रशांत जगताप यांनी केला होता. जगताप यांनी दावा केलाय मात्र 16 मार्चला भेटू असं आव्हान गिरीश बापट यांनी दिलं आहे.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

गिरीश बापट यांनी यावेळी पुणे महापालिका निवडणुकीसंदर्भात महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. पुणे महापालिका निवडणुकीत भाजपवर कोणाचाही परिणाम होणार नाही. अजित पवारांचा नाही तर कोणाचाच परिणाम आमच्यावर होणार नाही, असं गिरीश बापट म्हणाले. भाजपा पूर्ण बहुमताने सत्तेत येईल असा दावा, खासदार गिरीश बापटांनी केला. काँग्रेसच्या आंदोलक कार्यकर्त्यांचं महत्त्व वाढेल म्हणून विरोध केला नाही, असं देखील ते म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये