पुणे शहरराजकीय

विनोद मोहिते यांच्या शक्ती प्रदर्शनाची कर्वेनगरमध्ये चर्चा

पुणे : आगामी पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात निवडणुकीचे वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. निवडणूकीसाठी विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते जोरात तयारी करताना दिसत आहेत.  यातच कर्वेनगर मधील भाजपचे पदाधिकारी विनोद मोहिते यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने झालेले शक्ती प्रदर्शन कर्वेनगर परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे.

भाजप ओबीसी आघाडीचे शहर सरचिटणीस विनोद मोहिते यांचा वाढदिवस मोठया दणक्यात साजरा करण्यात आला. यावेळी मोहिते यांना शुभेच्छा देण्यासाठी कर्वेनगर परिसरातील कार्यकर्त्यांनी आणि नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोहिते यांच्या शक्ती प्रदर्शनाची मोठी चर्चा कर्वेनगर परीसरात सुरू आहे.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

विनोद मोहिते यांनी २०१९ साली झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत भाजप मध्ये प्रवेश केला आहे. त्यावेळी मोहिते यांच्या प्रवेशामुळे पाटील यांना कोथरूड विधानसभा निवडणूकीत मदत झाली होती. त्यापूर्वी मोहिते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये कार्यरत होते.

आगामी महापालिका निवडणुकीमध्ये भाजप प्रदेशाध्यक्ष आणि कोथरूडचे आमदार चंद्रकांत पाटील हे विनोद मोहिते यांना निवडणूकीत उमेदवारीची संधी देणार काय ? याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये