पुणे शहर

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याची पुणे महापालिकेची जय्यत तयारी

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौऱ्याची जय्यत तयारी सुरु असून या दौऱ्याच्या नियोजनाची बैठक घेऊन प्रत्यक्ष जागांची पाहणी केली. येत्या ६ मार्च रोजी होणाऱ्या या दौऱ्यात पुणे महापालिका, गरवारे मेट्रो स्टेशन येथे पंतप्रधान मोदी भेट देण्याचे नियोजन करण्यात येत आहे. याच सर्व ठिकाणांना प्रत्यक्ष भेटी देऊन आढावा घेतला. अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

मोहोळ म्हणाले, पंतप्रधान मोदीजी यांच्या दौऱ्याच्या नियोजन बैठकीस पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे, विभागीय आयुक्त सौरभ राव, महामेट्रोचे महासंचालक ब्रिजेश दीक्षित, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, आयुक्त विक्रम कुमार, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते गणेश बिडकर,पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पुणे ग्रामीणचे पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, पीएमपीएमएल अध्यक्ष लक्ष्मीनारायण मिश्रा, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, काँग्रेस गटनेते आबा बागुल, सेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार आदी उपस्थित होते.

भूमिपूजन केलेल्या पुणे मेट्रोच्या लोकार्पणसाठीही पंतप्रधान मोदीजी शहरात येताहेत ही समस्त पुणेकरांसाठी आनंदाची बाब आहे. पुणे महापालिका आवारात साकारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ट पुतळा स्मारकाचे आणि पुणेकरांचे स्वप्न असणाऱ्या मेट्रोचे लोकार्पण पंतप्रधान मोदीजी यांच्या हस्ते करण्याचे नियोजन आहे. शिवाय पंतप्रधान मोदीजी मेट्रोच्या गरवारे स्थानकापासून आनंदनगर स्थानकापर्यंतचा प्रवास करणार असून जवळ असणाऱ्या मैदानावर पुणेकरांना जाहीर कार्यक्रमाद्वारे संबोधित करण्याचेही प्रस्तावित आहे. या दृष्टीने आढावा घेतला.

Screenshot 2022 01 29 09 52 08 45

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये