आरोग्य

Covid 19 : चीनमधील वाढत्या कोरोना रुग्ण संख्येने भारतातही सतर्कतेचे निर्देश

नवी दिल्ली : चीनमध्ये अचानक करोना रुग्णांचा विस्फोट झाला असून रुग्णालये कमी पडू लागली आहेत. त्यामुळे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक झाली आहे. रुग्णसंख्येबाबत सतर्कता, संसर्गावर बारीक लक्ष ठेवणे आणि जास्तीत जास्त जीनोम सिक्वेंसिंग या तीन बाबींचे काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश त्यांनी अधिकारी वर्गाला दिले आहेत. 

चीनमध्ये झिरो कोव्हिड धोरण अंमलात आणण्याचा प्रयत्न असल्याने इतर देशांच्या तुलनेत कमी रुग्ण संख्या वाटत असली तरी हजारच्या वर रुग्ण आढळल्यास येथील यंत्रणेला युद्धपातळीवर काम करण्याचे आदेश दिले जातात. मागील काही दिवसांमध्ये चीनमध्ये अनेक शहरांमध्ये काही प्रमाणात लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे.

Fb img 1647413731457

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये