पुणे शहर

PUNE : लोहगावमधील पाणीपुरवठा 12 दिवसांपासून बंद

पुणे : लोहगाव परिसरातील पवारवाडी, माळवाडी, वाघमारे वस्ती, काळभोर वस्ती या भागात मागील 12 दिवसांपासून पाणीपुरवठा बंद आहे. दोन दिवसांत पाणीपुरवठा सुरू झाला नाही तर शिवसेनेच्या वतीने लोहगाव पंप हाऊसला कुलूप लावण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे वडगाव शेरी मतदार संघाचे विभाग संघटक अमोल पवार यांनी दिला आहे. तशा आशयाचे निवेदन पवार यांनी बंडगार्डन पाणीपुरवठा विभागाला दिले आहे.

यासंदर्भात मिळालेल्या माहितीनूसार या भागात तीन-चार दिवसांतून एकदा पाणी येते. पण या वेळी गेले बारा दिवस पाणी आलेले नाही. त्यामुळे नागरिकांचे खूप हाल होत आहेत. बंडगार्डन पाणी पुरवठा अधिकारी शाखाअभियंता सुधीर आलुरकर म्हणाले की, व्हॉल्व्हवरून मालाचा ट्रक गेल्यामुळे चौकातील जलवाहिनी व व्हॉल्व्ह तुटला होता. त्यामुळे पाणीपुरवठा बंद होता. आता दुरुस्ती चालू आहे. लवकरच पाणीपुरवठा सुरळीत चालू होईल.

Fb img 1647413731457

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये