पुणे शहर

पुण्यातील गुडलक चौकात साकारले प्रभू श्रीरामाचे 7 फुटी शिल्प; युवा सेना सचिव किरण साळी यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन 

पुणे : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्वप्नपूर्ती निमित्त शिवसेनेचे मुख्यनेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच युवा नेते खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेच्या माध्यमातून 7 फुटी  प्रभू श्रीराम शिल्प साकारण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्र युवासेना सचिव किरण साळी यांनी केले होते.

प्रभू श्रीराम प्राणप्रतिष्ठाच्या पूर्व संध्येला अभूतपूर्व असा प्रभू श्रीरामाचे लाईव्ह शिल्प सकारण्याचा कार्यक्रम पुणे शहरातील फर्ग्युसन कॅालेज रोड , डेक्कन येथे आयोजित करण्यात आला होता. आजवर 200 पेक्षा अधिक शिल्प सकारणारे महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिल्पकार श्री. सुरेशजी राऊत यांनी 7 फुट भव्य व आकर्षक असे शिल्प सलग 5 तासात तयार केले.

Img 20240123 wa00192359441083628621960

हजारो  पुणेकर श्रीराम भक्त हे शिल्प प्रत्यक्षात निर्माण होताना बघून मंत्रमुग्ध झाले. ‘जय श्रीराम’ च्या जयघोषाणे डेक्कन परिसरात नव चैतन्य निर्माण झाल्याचा अद्भुत भाव पुणे शहरातील सामाजिक , राजकीय , कला , क्रीडा, क्षेत्रातील मान्यवरांनी अनुभवला. दो धागे श्रीराम के नाम या अभियानाच्या प्रमुख अनघा घैसास यांनी देखील या कार्यक्रमास भेट दिली व आयोजनाबद्दल युवासेनेला शाबासकीची थाप देत शुभेच्छा दिल्या.

Img 20231109 wa001228129905032016030159557
Img 20230717 wa0012281298961742807603730839
Img 20230511 wa0002282292969174931887579613

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये