पुणे शहर

म्हातोबानगरमधील नागरिकांना मोठा दिलासा; पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नातून तात्पुरता रस्ता उपलब्ध

पुणे : कोथरूड मधील म्हातोबानगर रस्त्याचे काम गेली अनेक वर्ष रखडले होते. मात्र, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या प्रयत्नामुळे इथल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून, पाटील यांच्या प्रयत्नातून इथल्या नागरिकांसाठी तात्पुरत्या स्वरूपात रस्ता तयार करुन देण्यात आला आहे. त्यामुळे इथले नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

कोथरूड मधील म्हातोबानगर रस्त्याचे काम गेली अनेक वर्ष रखडले होते. मुख्य रस्त्याला जोडणारा रस्ता सुस्थितीत नसल्याने दरवर्षी पावसाळ्यात इथल्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे इथल्या नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी यंदा लोकसहभागातून तात्पुरत्या स्वरूपात रस्ता तयार करुन देण्यात आला आहे, यामुळे इथले नागरिक समाधान व्यक्त करत आहेत.

Img 20230717 wa0012
Img 20230511 wa000228129
Img 20221228 wa0001

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये