अब्दुल सत्तार व संजय राठोड मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर नेटकऱ्यांच्या टार्गेटवर
मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा आज विस्तार करण्यात आला. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी 18 नवनियुक्त मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. या 18 पैकी 2 मंत्री सध्या सोशल मीडियावर ट्रोल होताना दिसत आहेत. मंत्री अब्दुल सत्तार व संजय राठोड या दोन नवनियुक्त मंत्र्यांना नेटकऱ्यांकडून ट्रोल केले जात आहे.
महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसेनेचे मंत्री असताना पूजा चव्हाण या मुलीच्या आत्महत्या प्रकरणात संजय राठोड यांचे नाव आले होते. त्यावेळी भाजप कडून राठोड यांच्यावर वर महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करण्यात आला होता. पूजाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या राठोड यांच्यावर भाजपच्या चित्रा वाघ यांनी टीका करून त्यांच्यावर कारवाईची मागणी लावून धरली होती. या प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकारने राठोड यांचे मंत्रीपद काढून घेण्यात आले होते. त्याच राठोड यांना शिंदे सरकार मध्ये मंत्रीपद देण्यात आल्याने सरकार व राठोड यांच्यासह चित्रा वाघ यांच्यावरही टीका केली जात आहे. राठोड यांना मंत्रिपद देणे दुर्दैवी असल्याचे चित्रा वाघ यांनी म्हंटले असेल तरी पुढे त्या काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे.
नवीन मंत्री मंडळात शपथ घेतलेले अब्दुल सत्तार हेही आता चर्चेत आहेत. त्यांच्यावरही सोशल मीडियावर प्रचंड टीका केली जात आहे. दोन दिवसांपासून ते नवीन वादात सापडले आहेत. टी ई टी घोटाळ्यात त्यांचे नाव आल्याने वादंग निर्माण झाला आहे. या प्रकारामुळे त्यांना आज मंत्रीपद मिळणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष लागले होते, मात्र आजच्या मंत्री मंडळ विस्तारात त्यांनी शपथ घेतली आहे. त्यामुळे त्यांच्यावरही टीकेची झाड उठली आहे.
या दोघांना मंत्री पद देण्यात आल्याने विरोधी पक्षाला सरकारला कोंडीत पकडायची आयती संधीच मिळाली आहे. तर विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सरकार विरोधात आंदोलन करण्यास सूरवात केली आहे. सोशल मीडियावर ही संजय राठोड, अब्दुल सत्तार, चित्रा वाघ व शिंदे सरकारला नेटकऱ्यांनी ट्रॉल करण्यास सुरवात केली आहे.