महाराष्ट्र


अभिनेते रवींद्र बेर्डे यांचं निधन, वयाच्या 78व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मुंबई: मराठी अभिनेते रविंद्र बेर्डे यांचं वयाच्या ७८ व्या वर्षी निधन झालं. आपल्या अनोख्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली. रवींद्र बेर्डे यांना घशाच्या कर्करोगाचे निदान झाले होते. त्यांच्यावर मुंबईत टाटा रुग्णालयात उपचार सुरू होते.

रवींद्र बेर्डे हे अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे भाऊ होते. रवींद्र बेर्डे यांच्यावर उपचार सुरू असतानाच श्वास घेण्यासाठीही त्रास होत होता. दोन दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले होते. मात्र, अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

रवींद्र बेर्डे यांनी लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबतही अनेक चित्रपटांमध्ये काम केलं होतं. नभोवाणीसह नाट्यसृष्टीतही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला होता. चंगू मंगू, धमाल बाबल्या गणप्याची, एक गाडी बाकी अनाडी, खतरनाक, होऊन जाऊदे, हमाल दे धमा, थरथराट, धडाकेबाज, गंमत जंमत, झपाटलेल्या या गाजलेल्या चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला.

रवींद्र बेर्डे यांनी १९६५ मध्ये नाट्यसृष्टीत पाऊल टाकलं. तर चित्रपटसृष्टीत ३०० हून अधिक मराठी चित्रपटांमध्ये आणि ५ हिंदी चित्रपटांतही झळकले. १९९५ मध्ये व्यक्ती आणि वल्ली नाटकावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. गेल्या दहा ते १२ वर्षांपासून त्यांची कर्करोगाशी झुंज सुरू होती. रवींद्र बेर्डे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे

Img 20231109 wa00107449750233581593236
Img 20230717 wa0012281294586790481769091554
Img 20230511 wa0002282292722773256594657904
Img 20231109 wa0012281291226259195260975368
Img 20221228 wa000128229779882107384657043
Img 20230812 wa0001281295283768095978676207

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये