पुणे शहर
हॉटेलकडून GST बाबत फसवणूक करण्यात येत असल्याचा आरोप

पुणे : पुणे लष्कर (कॅम्प) येथील एका प्रसिद्ध रेस्टॉरंट कडून GST बाबत फसवणूक करण्यात येत असल्याचा आरोप रिपब्लिकन युवा मोर्चाकडून करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधितांवर गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी GST आयुक्तांकडे निवेदनाद्वारे रिपब्लिकन युवा मोर्चाकडून करण्यात आली आहे.
रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे यांनी याबाबत तक्रार केली आहे. हॉटेलमधून पार्सल ऑर्डर घेवुन जाताना बिल भरत असताना बिलावर हॉटेलचे नाव व GST नंबर नसल्याने संशय आल्यामुळे डंबाळे यांनी याबाबत चौकशी केली. सध्या हॉटेलवर GST कडून कारवाई करण्यात येत असल्याचे त्यांना समजले. त्यामुळे कारवाई सुरु असताना पुन्हा GST चोरीची बाब गुन्हेगारी स्वरुपाची असल्याने याबाबत कारवाईसाठी तक्रार केली असल्याचे डंबाळे यांनी सांगितले.



