पुणे शहर

पुणे महापालिका सभागृहात सर्वाधिक प्रश्न विचारणाऱ्या नगरसेविकांमध्ये पुणे शहरात छाया मारणे सर्वात पुढे

पुणे : पुणे शहरातील भाजप महिला नगरसेविकांनी पुणे महापालिका सभागृहातील मुख्य सभांमध्ये कशी कामगिरी केली याचा आढावा घेतला असता, कोथरूड मधील प्रभाग क्रमांक ११ च्या भाजपच्या नगरसेविका छाया मारणे यांनी सभागृहात सर्वाधिक प्रश्न विचारीत अव्वल क्रमांक पटकावला आहे. अशी माहिती महापालिकेच्या मुख्य सभांच्या आकडेवारीतून समोर आली आहे.

पुणे शहरातील भाजप नगरसेविकांमध्ये अर्चना पाटील 66 यांनी प्रथम आणि छाया मारणे यांनी 59 प्रश्न विचारीत दुसरा क्रमांक पटकावला आहे. पुणे शहरातील सार्वजनिक स्वच्छता गृह,मनपा शाळाविषयी प्रश्न, आरोग्य रस्ते,अनधिकृत बांधकामे,घनकचरा व्यवस्थापन महिला सबलीकरण आदी प्रश्न छाया मारणे यांनी प्राधान्याने उपस्थित केले आहेत.

Img 20220610 wa0330

पुणे महापालिकेत महिला आरक्षण लागू झाल्यापासून महिला नगरसेवकांची संख्या वाढत आहे. यातील अनेक महिला पुरूष नगरसेवकांपेक्षा प्रभावी कामगिरी करताना दिसतात. तर काही महिला केवळ नामधारी नगरसेविका असल्याचे चित्र आहे. या नगरसेविकांचे पतिराजच सर्व जबाबदारी पार पाडताना दिसतात.

पुणे महापालिकेत 2017 ते 2022 या पाच वर्षांच्या मुख्य सभांमधील  महिला नगरसेवकांच्या कामगिरीचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला असता, कोथरूड भागातील (प्रभाग क्रमांक 11 केळेवाडी- सुतारदरा) च्या  नगरसेविका छाया अजय मारणे यांनी पाच वर्षात महापालिकेच्या मुख्य सभांमध्ये सर्वाधिक 59 प्रश्न विचारले आहेत.

याबाबतीत नगरसेविका छाया मारणे म्हणाल्या, लोकांनी अडचणी सोडविण्यासाठी मला महापालिकेत पाठवले आहे. त्यामुळे लोकांचे प्रश्न महापालिकेच्या मुख्य सभेमध्ये मांडून ते प्रश्न प्रामाणिकपणे सोडविण्याचा प्रयत्न केला. यापुढील काळातही लोकांसाठी काम करीत राहणार आहे.

Img 20220621 wa00078738131563619319629

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये