पुणे शहर

विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी बंद होत असलेल्या जोग शाळेच्या समायोजन संदर्भात तातडीने निर्णय घ्यावा : बाबा धुमाळ

पुणे : कै. पी. बी. जोग प्रायमरी इं. मिडियम स्कूल मयूर कॉलनी कोथरुड व सिंहगड रोड वरील शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. अशा वेळी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ  नये यासाठी पी. जोग शाळेच्या समायोजन संदर्भातील निर्णय तातडीने घ्यावा अशी मागणी शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष व माजी नगरसेवक बाबा धुमाळ यांनी केली आहे.

या संदर्भातील मागणीचे पत्र धुमाळ यांच्याकडून महाराष्ट्र शासन, शिक्षण आयुक्तांना देण्यात आले आहे. धुमाळ म्हणाले,  कै. पी. बी. जोग प्रायमरी इं. मिडियम स्कूल मयूर कॉलनी कोथरुड व सिंहगड रोड वरील शाळा बंद होत असलेबाबतचा पत्रव्यवहार संबधित शिक्षण संस्थेने केलेला आहे. शिक्षण विभागाने २० फेब्रुवारी २०२४ ला याबबात समायोजन करण्यास मान्यता मिळणेबाबत प्रस्ताव सदर केला आहे.

मात्र अद्यापपर्यंत  त्यावर कोणत्याही प्रकारची कार्यवाही करणीय आलेली नाही त्यामुळे  पूर्वी RTE अंतर्गत प्रवेश झालेले विद्यार्थी व इतर विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये मुलांच्या शैक्षणिक भवितव्याची चिंता निर्माण झालेली आहे. तरी याबाबत विद्यार्थ्यांचे नुकसान टाळण्यासाठी  समायोजन बाबत त्वरित विचार करून तातडीने  निर्णय घेण्यात यावा अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.

Img 20230717 wa0012281298961742807603730839

शाळा बंद होत असल्याने विद्यार्थी व पालक सध्या चीतींत आहेत. मुलांचे पुढील शिक्षण कसे आणि कुठे होणार याबाबत त्यांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहेत. याबाबत वेळीच निर्णय होणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थी व पालकांचे हित लक्षात घेत आपण शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करत असल्याचे धुमाळ यांनी सांगितले.

Screenshot 2024 02 08 13 58 58 104172624598441830192
Img 20240202 wa00026664518766032457834

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये