पुण्यातील चांदणी चौकातील नवीन पुलाचे 90 टक्के काम पूर्ण; ‘या’ कालावधीत चांदणी चौकातील कामासाठी वाहतुकीत बदल

पुणे : पुणेकरांची चांदणी चौकातील नवीन पुलाची प्रतिक्षा आता संपली आहे.चांदणी चौकातील पूल सुरु करण्यासंदर्भात घोषणा झाली आहे. यामुळे पुणेकरांना आणखी एक चांगली सुविधा मिळणार आहे. चांदणी चौकातील पुलाचे जवळपास 90 टक्के काम पूर्ण झाले आहे.जुन्या पाडलेल्या पुलाच्या ठिकाणी नवीन पूल उभारण्याचे काम वेगाने करण्यात येत आहे. त्यासाठी १५ ते २० एप्रिल या काळात गर्डर टाकण्याचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या कालावधीत चांदणी चौकातील वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे.
पुणे शहराचे पश्चिम प्रवेशव्दार असलेल्या चांदणी चौकातील वाहतुकीच्या कोंडीमुळे पुण्यातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून त्रस्त आहेत. या वाहतूक कोंडीवर उपाययोजना म्हणून चांदणी चौकात बहुमजली उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामातील 90 टक्के काम पूर्ण झाले असून येत्या काही दिवसात हे काम पूर्ण होणार आहे. चांदणी चौकातील पुलाचे उद्घाटन 1 मे रोजी करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांची वाहतूक कोंडीच्या त्रासातून सुटका होणार आहे.

चांदणी चौकातीलराष्ट्रीय महामार्गमहामार्ग प्राधिकरणाकडून (एनएचएआय) येत असलेल्या उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. या पुलासाठी गर्डर टाकण्याचे काम १५ ते २० एप्रिल या कालावधीत करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे या कालावधीत चौकातील वाहतूक पर्यायी रस्त्याने वळविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिली आहे.
चांदणी चौकातील नवा उड्डाण पूल आणि रस्त्याचे उद्घाटन १ मे रोजी करण्याचे केंद्रीय भूपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी जाहीर केले आहे. या पार्श्वभूमीवर कामे वेळेवर आणि गतीने पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी परिसरात १५ मार्चला भेट देऊन कामांची पाहणी केली होती.
हे काम सुरू करण्यापूर्वी पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात येणार असून या मार्गाची माहिती नागरिकांनी करून देण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिली. चांदणी चौक परिसरातील नवा उड्डाण पूल आणि तेथील रस्त्यांचा एनएचएआयकडून आढावा घेण्यात आला.
२ ऑक्टोंबर रोजी पाडला होता पूल
चांदणी चौकातील पूल २ ऑक्टोंबर रोजी पाडला होता. अगदी सहा सेंकदात हा पूल पाडण्यात आला होता. पूल पाडण्यासाठी त्याला दीड ते दोन मीटर लांबीचे आणि साधारण 35 मिमी व्यासाचे 1 हजार 300 छिद्र पाडण्यात होते. मग 600 किलो इमल्शन स्फोटकांचा उपयोग वापर केला गेला होता. 1 हजार 350 डिटोनेटरचा उपयोगाने ब्लास्ट करण्यात आला. २ ऑक्टोंबर रोजी मध्यरात्री 1 ते 2 च्या दरम्यान पूल पाडण्यात आला.



